म्हसणे-सुलतानपुर शिवारात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

म्हसणे-सुलतानपुर शिवारात बेवारस मृतदेह आढळल्याने खळबळ

पारनेर | तालुका प्रतिनिधी

तालुक्यातील म्हसणे- सुलतानपुर शिवारात एका बेवारस मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. गुरुवार (२५ ऑगस्ट) रात्री संबंधित घटना उघडकीस आली आहे.

गुरुवारी रात्री म्हसणे-वडनेर रोडवर तुकाई मंदीराजवळ दंगाबाज मळ्याजवळ एक अनोळखी प्रेत पडले आहे अशी माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक डॉ नितीनकुमार गोकावे, पो संपत खैरे, यंशवत ठोबरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव केली असता रस्ताच्या कडेलाच एक तरुण मृत अवस्थेत आढळला.

पोलिसांनी सांगितलेल्या वर्णनात म्हटले आहे, त्याच्या चेहरा उभा असुन अंगात विटकरी कलरचा चौकडी शर्ट असुन निळी पँट घातलेली आहे. त्याच्या गळ्यावर SKY असे इंग्रजी मध्ये गोंधलेले असुन हाता वर सलाईन लावल्याची पट्टी आहे.

सुपा पोलिसांनी सदर घटनेचा पंचनामा करत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुपा पोलिसांनी सदर मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेऊन उत्तराय तपासणी करून मृतदेह नातेवाईकाचा शोध लागेपर्यंत अहमदनगर येथील सिव्हील रुग्णालयातील शवगारात ठेवण्यात आला असून पुढील तपास पोलिस नायक यशवंत ठोबरे हे करत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com