नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

तिघा जणांवर पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नोकरी लावण्याच्या आमिषाने तीन लाखांची फसवणूक

पारनेर | Parner

पारनेर तालुक्यातील करंदी येथे एकास नेव्ही मध्ये नोकरीला लावतो म्हणून पैसे घेतले व नोकरीला न लावता पैसे परत न केल्यामुळे तिघां विरोधात पारनेर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पारनेर तालुक्यातील करंदी येथील बाळासाहेब काशिनाथ चौधरी यांच्याकडून मुलास नेव्ही मध्ये नोकरीला लावतो असे म्हणून आरोपी संकेत बाळासाहेब कडुसकर, बाळासाहेब शंकर कडुसकर (दोघे राहणार काताळवेढा ता.पारनेर) व नितीन डोंगरे (डोंगरवाडी काताळवेढा ता. पारनेर) यांनी 3 लाख 19 हजार 250 रुपये घेऊन मुलास नोकरीला लावतो असे सांगितले.

मात्र नोकरीला न लावल्यामुळे त्यांची फसवणूक झाली तसेच दिलेले पैसेही आरोपींनी परत केले नाहीत तसेच फोनवरून शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे बाळासाहेब चौधरी यांनी तिघांविरुद्ध पारनेर पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली असून त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उगले करत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com