पाडळी आळेत दरोडा; एकाला अटक

पाडळी आळेत दरोडा; एकाला अटक

पारनेर | प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील अळकुटी-बेल्हे रोडवरील पाडळी आळे शिवारात निघोजच्या आरोपींनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोडा टाकणारा निघोजचा रहिवाशी आरोपी गणेश ज्ञानदेव ढवण (वय ३५) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक विजय बोत्रे यांनी दिली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सफारी गाडी पोलिसांनी जप्त केली आहे.

यासंदर्भात सागर सुनील भगत (वय ३२, रा. चिंचोली, ता. पारनेर) यांनी फिर्याद दिली आहे. दि. ४ सप्टेंबर रोजी रात्री आडेआठच्या दरम्यान पाडळी आळे शिवारातून साताऱ्याकडे फिर्यादी भगत हे छोटा हत्ती टेम्पो घेऊन जात होते. यावेळी भगत यांनी टाटा सफारी (क्रमांक एमएच १२ सीई ८१८३) मधून आलेल्या आरोपींनी सफारी गाडी आडवी लाऊन फिर्यादी भगत आणि भगत यांच्या गाडीच्या पाठीमागुन जात असलेल्या पिकअप वाहनाचे चालक रविंद्र भोईर यांना मारहाण करून १५ हजार रूपयांची रोख रक्कम काढून घेतली होती. आरोपींमध्ये पप्पू लामखडेसह दत्ता गुंड (रा. निघोज) इतर सहा जणांचा समावेश आहे. गुन्ह्यात वापरलेली सफारी गाडी आरोपी पप्पू लामखडे (रा. टाकळी हाजी) याची असून ती जप्त करण्यात आली आहे.

यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात सागर भगत यांच्या फिर्यादीवरून भादंवि. कलम ३९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर गुन्ह्याचे तपासी अधिकारी उपनिरीक्षक विजय बोत्रे यांनी आरोपी गणेश ज्ञानदेव ढवण (वय ३५, रा. निघोज, ता. पारनेर) याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सफारी गाडी देखील जप्त करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक बोत्रे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com