
पारनेर | तालुका प्रतिनिधी
तरुणांना टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हंगा येथे घडली आहे. कोयता, काठी तसेच लाथाबुक्क्यांनी तरुणांना मारहाण करण्यात आली आहे.
याप्रकरणी विशाल लांडे याने दिलेल्या फिर्यादीवरून आश्रफ पठाण, आरबाज पठाण, शाबीर शेख, समीर शेख, अजय बर्डे, ओंकार शिंदे, अफसर शेख, दिशान शेख, आयाज शेख (सर्व रा. हंगा ता पारनेर) यांच्या विरोधात सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीने म्हंटले आहे की, मी मित्रा बरोबर अक्षय भाऊसाहेब थोरात यास पारनेर येथुन वाळवणे येथे घरी सोडविण्याकरीता जात असताना साठेवस्ती कडे जाणाऱ्या रोडवर आरोपी शाबीर शेख व आयाज शेख यांनी त्यांचे हातातील कोयत्याने अक्षय यास डोक्यात मारहान करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. व इतर आरोपींनी अनिकेत ढकले याला काठीने व लाथा बुक्याने मारहान केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहे.