
पारनेर | प्रतिनिधी
पारनेर खडकवाडी मांडओहोळ येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही चिखलठाण ता. राहुरी येथील असून हल्ली ती खडकवाडी मांडव ओहळ येथे राहत आहे. तिने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अरुण गुलाब मधे (रा. खडकवाडी मांडळ ओहोळ ता.पारनेर) याने ती खडकवाडी येथे मामाकडे राहत असताना डोंगरावर मामाचे जनावरे चारण्यास नेली असता आरोपीने तिच्यासोबत ओळख करून माझ्या मनाप्रमाणे वागली नाही तर व कोणाला काही सांगितलं तर मी तुला मारून टाकीन,असा दम देऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरी करून अत्याचार केला व कोणास त्याबाबत काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
याबाबत अल्पवयीन मुलीने पारनेर पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या फिर्यादीवरून अरुण मधे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ करत आहेत.