स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून 50 हजाराचा गंडा; संशयित महिला जेरबंद, दोघे फरार

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून 50 हजाराचा गंडा; संशयित महिला जेरबंद, दोघे फरार

पारनेर ( तालुका प्रतिनिधी)

स्वस्तात सोने देतो असे अमिष दाखवून पुणे येथील एकाचे अहमदनगर पुणे महामार्गावरील पळवे खुर्द शिवारात (ता. पारनेर)  पन्नास हजार रुपये लूटण्याचा प्रकार घडला होता. सुपा पोलिसांनी एका आरोपीस मोठ्या शिताफिने पकडले असुन दोन आरोपींचा शोध सुरू आहे.

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून 50 हजाराचा गंडा; संशयित महिला जेरबंद, दोघे फरार
Crime News : पत्नीनेच केला पतीचा खून केला; भावाच्या मदतीने काढला काटा

याबाबत रणजीत बाबासाहेब गायकवाड (रा.मांजरी ता. हवेली जिल्हा पुणे) यांनी सुपा पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोमवारी (दि 25) सकाळी ’तुम्हाला  स्वस्थात सोने देतो उद्या पाच लाख रुपये घेऊन अहमदनगर पुणे महामार्गावरील पळवे शिवारातील हँटेल गंगासागर जवळील बंद हाँटेल जवळ या’ असा कॉल त्यांना आला. गायकवाड यांनी यावर विश्‍वास ठेवून मंगळवारी स्वताच्या रिक्षाने ते पळवे शिवारातील हाँटेल  गंगासागर जवळ जाऊन थांबले. पुढे सर्विस स्टेशन जवळ गाडी लावून आत कच्चा रस्ताने आत त्यांना बोलवण्यात आले.  

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

तेथे एक पुरुष व दोन महीला होत्या त्यांनी पैशांची मागणी केली. तर गायकवाड यांनी  आधी सोने दाखवा अशी मागणी केली. संशयितांनी  कपड्यात गुढळलेल्या पितळी धातुच्या अंगठ्या दाखवल्या. त्या खोट्या असल्याचे जानवताच गायकवाड परत जाण्यासाठी निघाले असता तिघांनी त्यांना अडवून मारहाण करत खिशातील पन्नास हजार रुपये काढुन घेतले व ते तेथुन फरार झाले.  सुपा पोलिसांनी फोन लोकेशन वर्णन व चौकशी वरुन जनसेवा किरण भोसले (रा .कोळगाव ता. श्रीगोंदा) या संशयित महिलेस अटक केले आहे. तीच्या माहिती वरुन या घटनेतील जावेद घड्याळा चव्हाण व पॅटी आदी काळे हे फरार  आहेत. सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस  निरिक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली  पी एस आय  पठाण पुढील तपास करत  आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com