पारनेरच्या दाम्पत्याचा नगरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

दीराकडून अत्याचार || कोतवालीत चौघांविरूद्ध गुन्हा
पारनेरच्या दाम्पत्याचा नगरमध्ये आत्महत्येचा प्रयत्न

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दीराकडून होणार्‍या शारीरिक अत्याचाराला (Physical Abuse) कंटाळून व पोलिसात (Police) तक्रार केल्यास कुटुंबियांना मारण्याची धमकी (Threat) दिल्यामुळे पारनेर (Parner) येथील पीडित महिलेसह तिच्या पतीने आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Try) केल्याची घटना नगर शहरात (Nagar City) घडली. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) चौघांविरूद्ध गुन्हा दाखल (Filed a crime) करण्यात आला आहे.

सप्टेंबर 2021 ते 7 एप्रिल 2022 या काळात वेळोवेळी हा प्रकार घडल्याचे व 7 एप्रिल रोजी पीडित दाम्पत्याने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न (Suicide Try) केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 20 सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी पीडित महिला घरी एकटी असताना तिच्या दीराने घराजवळील ओढ्यात नेवून बळजबरीने शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर पीडित महिला ऑक्टोबरमध्ये घरी पायी जात असताना दीराने बळजबरीने गाडीत बसवून पळवे फाटा येथे एका हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी शारिरिक संबंध ठेवले.

फेब्रुवारी 2022 मध्ये पीडित महिला घरी एकटी असताना दीर व त्याच्या पत्नीने मारहाण (Beating) केली व सोन्याचे दागिने काढून घेवून गेले. या त्रासाला कंटाळून पीडितेने सर्व प्रकार पतीला सांगितला. तिला घेऊन तिचा पती दीराच्या घरी गेला. यावेळी तिघांनी शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी (Threat) दिली. दोघे पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास जात असताना रोडवर चारचाकी गाडी आडवी लावून दोघांनी त्यांना घरी नेले व पोलिसात तक्रार दिली, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबास जिवे ठार मारू, अशी धमकी (Threat) दिली.

या प्रकाराला कंटाळून पीडित व तिच्या पतीने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला व केडगाव येथे आईकडे काही दिवस राहिले. त्यानंतर माळीवाडा येथे एका लॉजवर जाऊन 7 एप्रिलला रात्री विषारी औषध घेतले, असे फिर्यादित म्हटले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विवेक पवार हे करत आहेत.

Related Stories

No stories found.