पारनेर तालुक्यात गुरुवारी 23 करोना बाधीत

पारनेर तालुक्यात गुरुवारी 23 करोना बाधीत

सुपा |वार्ताहर| Supa

गुरुवार (दि. 20) रोजी पारनेर तालुक्यातील प्राप्त झालेल्या करोना चाचणीच्या अहवालानुसार 23 जणांना करोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

भाळवणी 3, कान्हूर पठार 5, वाळवणे 1, पारनेर शहर 3, गुणोरे 3, हंगे 2, पिंपळगाव तुर्क 1, टाकळी हाजी 1, रांजणगाव मशीद 1, शहाजापूर 1, देवीभोयरे 1, जवळा 1 या गावांचा समावेश आहे.

कान्हूर पठार येथे करोनाचा संसर्ग वाढत आहे. दररोज येणार्‍या अहवालात कान्हूर पठार येथे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. तर शासकीय लॅबच्या अहवालानुसार तालुक्यातील 18 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे.

पारनेर शहर 9, निघोज 6, सुपा 2, किंन्ही 1 यांचा समावेश आहे. तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या आता 600 वर पोहचली आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी व सध्याचे हवामान हे इतर आजारांसाठी पोषक आहे.

करोना सदृश्य लक्षणे दिसताच त्वरीत आरोग्य विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी केले आहे. ज्या ठिकाणी रुग्ण निघाले तो परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com