पारनेर तालुक्यात आज 15 करोना पॉझिटिव्ह रूग्ण
सार्वमत

पारनेर तालुक्यात आज 15 करोना पॉझिटिव्ह रूग्ण

Arvind Arkhade

सुपा|वार्ताहार| Supa

पारनेर तालुक्यातील करोनाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. आज दि. 14 रोजी तालुक्यातील करोना चाचणीचे 15 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली आहे.

यामुळे तालुक्यातील करोना बाधितांचे आकडा साडेचारशेच्या जवळ पोहोचला आहे. आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 15 व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या पॉझिटिव्ह अहवालामध्ये ढोकी 3, राळेगण सिद्धी 2, गोरेगाव 2, डिसकळ 2, सारोळा अडवाई 1, निघोज 1, पारनेर शहर 1, कासारे 1, बुगेवाडी 1, सुपा 1.

तर तालुक्यातील 24 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहे. यामध्ये भाळवणी 9 राळेगण सिद्धी 6, गोरेगाव 3, डिसकळ 3, भोयरे गांगर्डा 1, कासारे 1 या गावांचा निगेटिव्ह अहवालात समावेश आहे.

तसेच ढोकी हे गाव 3 दिवस बंद व राळेगण सिद्धी गाव 14 दिवस बंद करण्याचे निर्देश पोलीस निरीक्षक यांना तहसीलदार यांनी दिले आहेत.

ज्या गावातील करोना बाधित व्यक्ती अहवालात निष्पन्न झाले आहे. त्या व्यक्ती राहत असलेला 100 मीटरचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com