corona
corona
सार्वमत

पारनेर तालुक्यात आज 6 करोना बाधित रूग्ण

निघोज येथे हॉटेल व्यावसायिकचा करोनाने मृत्यू

Arvind Arkhade

सुपा |वार्ताहार| Supa

पारनेर तालुक्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आज (शनिवारी) 6 ने वाढली आहे. आज प्राप्त झालेल्या करोना चाचणीत 6 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश लाळगे यांनी दिली आहे. यात जवळा 2, बुगेवाडी 1, पाडळी दर्या 1, देवीभोयरे 1, हंगा 1 असे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

तर निगेटिव्ह अहवालामध्ये देवीभोयरे 3, पठारवाडी 2, बुगेवाडी 5, कर्जुले हर्या 2, पुणेवाडी 1, निघोज 4, गोरेगाव 3, वडगाव सावताळ 1, वेसदरे 2, सुपा 9, राळेगणसिद्धी 1, शिरापूर 3, कडूस 1, पारनेर 6, वडगाव आमलीव 1, हंगे 3, डिसकळ 1, असे 48 अहवाल निगिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

ज्या गावातील भागात करोना पॉझिटिव्ह व्यक्ती सापडले आहेत तेथील 100 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करण्याचे आदेश तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिले आहे.

दरम्यान करोना पॉझिटिव्ह आलेल्या निघोज येथील व्यवसायिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हा मुळचा पठारवाडी येथील आहे. पती पत्नी दोघे 5 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आले होते.

तसेच पारनेर येथील एका व्यक्तीचा अहवाल 1 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्याचाही मृत्यू काल झाला आहे. मात्र त्यामागचे कारण वेगळे असल्याची माहिती समजते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com