पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना

बाधितांची संख्या कमी होत नसल्याचे घेतला निर्णय
पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट (Corona second wave) ओसरत असतांना 15 जूनपासून पारनेर (Parner) तालुका करोना बाधितांच्या संख्येत जिल्ह्यात टॉप तीनमध्ये आहे. यामुळे बुधवारी झालेल्या व्हिसीमध्ये मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पारनेरमधील करोनाची स्थिती गांभीर्यान घेत तालुक्यात बाधित रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) (Genome Sequence) करून घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.

पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना
Video : राहुरी खुर्दमध्ये सरपंचपदाच्या निवडीवेळी दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते समोरासमोर भिडले; काही काळ तणाव, पाहा व्हिडिओ

जिल्ह्यात अनेक तालुक्यात करोना उतरणीला लागलेली आहे. मात्र, पारनेर तालुक्यात नव्याने बाधित येणारे रुग्णांची संख्या जिल्ह्यातील अन्य तालुक्याच्या तुलनेत अधिक आहे. 15 जूनपासून करोना बाधितांची आकडेवारी पाहिल्यास केवळ तीन वेगळ्या दिवशी पारनेर तालुक्यातील बाधितांची संख्या तिसर्‍या क्रमांकावर होता. उर्वरित दिवशी पारनेर तालुका जिल्ह्यात बाधीतांच्या संख्येत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तालुक्यातील नवे बाधित होणार्‍याच्या संख्या घटत होतांना दिसत नाही.

बुधवारी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिसीव्दारे जिल्ह्यातील करोनाचा आढावा घेतला. या ऑनलाईन बैठकीत पारनेरच्या करोनावर चर्चा झाली. यात पूर्वी पॉझिटिव्हीटी दर जास्त असलेल्या तालुक्यात करोनाची स्थिती सुधारत असतांना पारनेर तालुक्यातील स्थिती वेगळी असल्याचे समोर आले. त्यामुळे पारनेर तालुक्यात जनुकीय उत्प्रवर्तन करून घ्या, त्यातून नवीन व्हेरिंयट तर आला नाही, ना याची खातरजमा होईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानूसार आता पारनेर तालुक्यात करोना बाधित येणार्‍या रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुनने पुण्याच्या एनआयव्ही (राष्ट्रीय विषाणू तपासणी प्रयोग शाळेत) (National Institute of Virology) पाठविण्यात येणार आहेत. त्या ठिकाणी जनुकीय उत्प्रवर्तन (जिनोम सिक्वेन्सी) करण्यात येणार आहे.

पारनेरच्या करोना रुग्णांची जनुकीय उत्प्रवर्तन तपासणी होणार; मुख्यमंत्र्यांची सुचना
अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू

यापूर्वी जिल्हा रुग्णालयातून रॅन्डमपध्दतीने आठवड्यातून काही दिवस असे नमुने घेवून एनआयव्हीला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. मात्र, अद्याप जिल्ह्यात करोना विषाणूच्या नवीन व्हेरिंयटबाबत काही माहिती मिळालेली नाही. मात्र, पारनेरच्या रुग्णांचे नमुने तपासणीनंतर काय समोर येणार याकडे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेस सर्वाचे लक्ष राहणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com