पारनेर कारखान्यातील घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल..!

किरीट सोमय्या यांनी साधला शेतकरी, कामगार यांच्याशी संवाद
पारनेर कारखान्यातील घोटाळ्याचा हिशोब द्यावाच लागेल..!

पारनेर |प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुका (Parner Taluka) सहकारी साखर कारखान्यांच्या (Co-operative sugar factories) विक्रीत झालेल्या घोटाळ्याबाबत (Scams) मला मोदी सरकारचा (Modi Government) निरोप आला होता. या कारखान्यांच्या विक्रीत घोटाळे (Scams in factory sales) करून शेतकरी व मजुरांच्या नावावर बंगले बांधण्याचे विचार करीत असेल तर त्यांची मस्ती उतरवण्याचे काम मी करणार आहे. कारखान्यांतील घोटाळेबाजांना घोटाळ्याच्या हिशोब द्यावाच लागेल. असा इशारा (Hint) भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Former BJP MP Kirit Somaiya) यांनी दिला.

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या (Parner Co-operative Sugar Factory) विक्री प्रक्रियेची सक्त वसूली संचालनालया (ईडी) (ED) मार्फत चौकशी (Investigation) करावी, या मागणीच्या अनुषंगाने सोमय्या (Kirit Somaiya) यांनी गुरूवारी पारनेर कारखाना (Parner factory) (कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगारांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सहकारी बँकेने संशयास्पदपणे विक्री केलेल्या साखर कारखान्यांची चौकशी (Inquiry) व्हावी, यासाठी संपूर्ण राज्यात जागृती झाली आहे. यामुळेच उस उत्पादक शेतकरी, कामगार हे राज्य सहकारी बँकेने केलेल्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी करत आहेत. उच्च न्यायालयाच्या (High Court Order) आदेशानुसार पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद विक्री व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. पारनेरच्या सभासदांना निश्चित न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of Mumbai High Court) ‘पारनेर’च्या विक्री व्यवहाराची सक्त वसुली संचालनालया (ईडी) (ED) मार्फत चौकशी करण्याचे आदेश देऊनही सक्तवसुली संचलनालयाच्या मुंबई विभागाने कारवाई केली नाही. त्यामुळे पारनेर कारखाना बचाव समितीचे रामदास घावटे, बबनराव कवाद यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Union Minister of State for Finance Dr. Bhagwat Karad), ईडीफचे मुख्य संचालक संजय मिश्रा यांची दिल्ली येथे भेट घेऊन पारनेरच्या संशयास्पद विक्री व्यवहाराची ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्याचवेळी घावटे व कवाद यांनी माजी खासदार किरीट सोमय्या (Former MP Kirit Somaiya) यांची भेट ‘पारनेर’ प्रकरणी लक्ष घालावे अशी विनंती केली होती. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, जिल्हाध्यक्ष दक्षिण अरुण मुंडे, रामदास घावटे, बबन कवाद, साहेबराव मोरे, विश्वनाथ कोरडे, अश्विनी थोरात, सुनील थोरात, कामगार नेते शिवाजी औटी, सुभाष बेलोटे, बाबुराव मुळे आदी उपस्थित होते.

माजी खासदार सोमय्या (Former BJP MP Kirit Somaiya) म्हणाले की, सभासदांच्या कष्टाच्या पैश्यातून उभारलेल्या साखर कारखान्यांची विक्री धनदांडग्या राजकारण्यांच्या आर्थिक फायद्यासाठी केली जाते ही संतापजनक बाब आहे.चालू अवस्थेतील पारनेर कारखाना कोणी बंद पाडला.कोणाच्या सांगण्यावरून कोट्यवधी रुपयांच्या कारखान्याच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री झाली याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याचे सोमय्या म्हणाले. राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या सभासदांच्या हिताच्या आड कोणी येणार असेल, सोमय्या पारनेरला आल्यामुळे कारखाना बंद पडेल असा कोणी शेतकरी व कामगारांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन भ्रम निर्माण करीत असतील तर त्यांच्या बंदुकितील गोळया आपल्याकडे असल्याचे सोमय्या म्हणाले. कोणत्याही परिस्थितीत कारखाना बंद होणार नाही, शेतकरी व कामगारांच्या हिताची जपवणूक करण्यासाठीच मी इथे आल्याचे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.