पारनेर तालुक्यात लष्करी अळींचा प्रादूर्भाव

पिके धोक्यात आल्याने शेतकरी चिंतेत
पारनेर तालुक्यात लष्करी अळींचा प्रादूर्भाव
File Photo

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर तालुक्यातील बदलत्या हवमानाचा परिणाम होऊन ज्वारी, हरभरा व मका पीक लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव झाला आहे. यामुळे शेतकर्‍यांची पिके धोक्यात आली आहेत. कृषी विभागाने तातडीने याबाबत उपायोजना राबविण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

पारनेर तालुक्यात निसर्गाच्या लहरीपणाचा शेतकर्‍यांना मोठा फटका बसत आहे. अवकाळी पावसामुळे काढलेला कांदा झाकपाकीसाठी बळीराजाची धावपळ होत आहे तर नुकत्याच लावलेल्या कांद्याला ढगाळ वातावरणामुळे विविध रोगांनी घेरले आहे. सुपासह भोयरे गांगर्डा, कडूस, पळवे येथे अत्यंत कमी पाऊस झाला आहे. विहिरी तसेच तलाव कोरडेठाक आहेत.

तर सुपा, वाळवणे, रूईछत्रपती, आपधूप, वाघुंडे, रांजणगाव मशीद आदी ठिकाणी परतीच्या पावसाने पेरणी करून उगवलेल्या ज्वारी हरभरा व मका पिकांना चांगले जीवदान मिळाले आहे, मात्र पिकांवर लष्करी अळीचा प्रादूर्भाव झाल्याने ही पिके धोक्यात आली आहेत. ही अळी खोड पोखरते. पिकाचा शेंडा तसेच पानेही खाऊन पिके फस्त करत आहेत असे शेतकर्‍यांनी सांगितले. नुकतीच उगवण झालेला हरभरा देखील ही अळी खात असल्याने शेतकरी हैरान झाला आहे.

बेन्झोएट, कोराजीनच्या फवारणीचे आवाहन

वातावरणातील बदलामुळे लष्करी अळीचे प्रमाण वाढले आहे. शासकीय मदत मिळेपर्यंत तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. ही अळी लष्करी अळीच आहे. त्यावर तातडीने औषध फवारणी करणे आवश्यक आहे. यावर उपाय म्हणजे इमॅमेप्टीन बेन्झोएट 8 ग्रॅम किंवा कोराजीन 8 मिली प्रती पंप प्रमाणे फवारणी करावी, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com