
पारनेर | तालुका प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील मावळेवाडी येथिल जिल्हा परिषद प्राथामिक शाळा व ग्रामपंचायतच्या शौचालय अज्ञात व्यक्तींनी पाडून नुकसान केले आहे.
मावळेवाडी गावच्या ग्रामसेविका संगिता गोसावी यांनी सुपा पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. यानुसार अज्ञात व्यक्तीं वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत म्हटले आहे की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन व ग्रामपंचायत कार्यालयाचे एक असे एकूण चार शौचालयाचे अज्ञात व्यक्तींनी पाडून नुकसान केले आहे. गावातील काहींनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
मावळेवाडी गावचे सरपंच उदय कुरकुटे, उपसरपंच गणेश पठारे व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी अशा मनोवृत्ती प्रवृतीच्या आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पुढील तपास सुपा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पठाण हे पुढील तपास करीत आहेत.