पारनेरात सत्तारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध

राजीनामा घेण्याची राष्ट्रवादीची मागणी
पारनेरात सत्तारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना अतिशय खालच्या पातळीवर वक्तव्य केले. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पारनेर येथे सत्तारांच्या प्रतिमेला चपलांचा हार घालून निषेध नोेंदवण्यात आला.

आमदार निलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पारनेर शहरातील खालची वेस याठिकाणी निषेध आंदोलन केले. खा.सुप्रियाताई सुळे यांची कृषिमंत्र्यांनी व्यक्तिगत माफी मागावी व महिलांबाबत अपमानकारक विधान करणार्‍या मंत्र्यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. राष्ट्रवादीच्या पारनेरच्या सर्व महिला पदाधिकार्‍यांनी अब्दुल सत्तारांच्या कुटुंबातील महिलांना साडी चोळीचा व अब्दुल सत्तारांना बांगड्यांचा आहेर पाठविला आहे.

मंत्री सत्तारांच्या विरोधात आंदोलनावेळी आमदार निलेश लंके म्हणाले, कृषीमंत्री सत्तार यांची कुत्र्याबरोबर तुलना करण्याचीही लायकी नाही. त्यामुळे कुत्रा चिन्हावर निवडून येण्याची भाषा निंदनीय व बेताल आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज नाही, असे वक्तव्य करून शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सत्तार यांनी केले. सत्तार यांनी आपली बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली आहे. माता भगिनींचा अपमान केला आहे.

यावेळी माजी सभापती गंगाराम बेलकर, राष्ट्रवादीचेे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते जितेश सरडे, युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, रा. या.औेटी, सुदाम पवार, अमोल उगले, स्वप्निल झावरे, दादा शिंदे, मेजर कारभारी पोटघन, नंदकुमार देशमुख, विक्रम कळमकर, रवींद्र गायखे, सोमनाथ वरखडे, डॉ. बाळासाहेब कावरे, विजय डोळ, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, सभापती डॉ. विद्या कावरे, सभापती प्रियंका औटी, नगरसेविका हिमिनी नगरे, निता औटी, सुप्रिया शिंदे, पाकीजा शेख आदी उपस्थित होते.

गाड्या फोडून चप्पलांचा हार घालणार

संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्यामुळे कितीही बंदोबस्त असला तरी नगर जिल्ह्यात आल्यावर चपलांचा हार घालणारच. गाड्या फोडणे हा आमचा जुना पिंड आहे, त्यामुळे कितीही पोलीस बंदोबस्तात सत्तारांनी जिल्ह्यात यावे आम्ही गाड्या फोडल्याशिवाय राहणार नाही,असे आव्हान आमदार लंके यांनी दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com