टाकळीच्या जवाहर नवोदय विद्यालयात करोनाचा स्फोट

आणखी ५२ विद्यार्थी करोना बाधित
टाकळीच्या जवाहर नवोदय विद्यालयात करोनाचा स्फोट
करोनाबाधित

पारनेर | प्रतिनिधी

टाकळी ढोकेश्वर येथील जवाहर नवोदय विद्यालयातील करोना बाधितांची संख्या आता 51 आहे. विद्यालयातील सर्वांचे करोनाचे अहवाल प्राप्त झाले असून यातील 50 अहवालांवर शंका उपस्थित झाल्याने ते रविवारी पुन्हा फेरतपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. विद्यालयातील बाधितांमध्ये 48 विद्यार्थी आणि 3 विद्यालयातील कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

करोनाबाधित
नव्या वर्षात WhatsApp मध्ये येणार नवे फीचर्स, जाणून घ्या...

टाकळी ढोकेश्वरच्या जवाहर नवोदय विद्यालयातील 10 विद्यार्थ्यांचा करोना अहवाल गुरूवार (दि.23) रोजी आला होता. त्यानंतर शुक्रवारी रोजी आणखी दहा जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तर शनिवार आणि रविवार मिळून आणखी 31 जणांचा करोनाचा अहवाल पॉझिटीव्ह आलेला आहे. बाधित विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांना पारनेरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रविवारी (काल) दुपारी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षिरसागर, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, जिल्हा शल्यचिकित्सक भुषणकुमार रामटेके, तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, गटविकास अधिकारी किशोर माने यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीश लोंढे यांनी नवोदय विद्यालयाला भेट देऊन पाहणी केली. या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक यांच्याशी संवाद साधला. दरम्यान, रविवारपर्यंत विद्यालयातील 500 च्या वर नमुने आरोग्य विभागाने घेतले असून यात 51 जण बाधित आढळल्याने विद्यार्थी व शिक्षक धास्तावले आहेत. हे विद्यालय निवासी विद्यालय असून या ठिकाणी विद्यार्थी एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे हा आकडा वाढला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पाल्याला ताब्यात प्रशासनाचा नकार

नवोदय विद्यालयातील 51 विद्यार्थी करोना बाधित आढळल्यानंतर अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांनी आमच्या पाल्यांना आमच्या ताब्यात द्यावेत, अशी मागणी केली. मात्र, पाल्य पालकांच्या ताब्यात देण्यास विद्यालय प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने नकार दिला आहे. अद्याप 50 विद्यार्थ्यांच्या फेर नमुन्यांचा निकाल येणे बाकी असून बाधित विद्यार्थी समाजात पोहसल्यास त्यातून मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत. या विषयावर रविवारी जिल्हाधिकारी आणि पालकांची टाकळीमध्ये बैठक झाली.

करोनाबाधित
मुंबईत राहूनही मराठी येत नाही?; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने कपिल शर्माला झापलं

जिल्हाधिकारी तीन दिवसांनी घटनास्थळी

नवोदय विद्यालय समितीचे जिल्हाधिकारी हे पदसिद्ध अध्यक्ष असून या विद्यालयात तीनच दिवसांत 51 विद्यार्थी सहशिक्षक करोना बाधित आढळून आले. त्यामुळे ही घटना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गांभीर्याने घेतली नसल्याचा आरोप या विद्यालयातील पाल्याच्या पालकांनी केला आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात सर्वात जास्त रुग्ण या नवोदय विद्यालयमध्ये आढळून आले असून जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी तीन दिवसांनी घटनास्थळी भेट दिल्याने पालकांनी व ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com