परळी पीपल्समधील 11 कोटींचा गैरव्यवहार, दोघांना अटक

नगरच्या आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई
परळी पीपल्समधील 11 कोटींचा गैरव्यवहार, दोघांना अटक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

परळी पीपल्स मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या (Parli People's Multistate Co-operative Society) 11 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने (Financial Crimes Branch) दोन आरोपींना अटक (Arrested) केली आहे. विश्वजित राजेसाहेब ठोंबरे व प्रमोद खेेडकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने 12 जुलैपर्यंत पोलीस कोठडी (Police cell) दिली.

श्रीरामपूर शाखेत (Shrirampur Branch) ठेवलेल्या ठेवी परत न मिळाल्यामुळे ठेवीदाराने श्रीरामपूर ठाण्यात फिर्याद दिली. याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. यापूर्वी अमित गोडसे याला अटक झाली आहे. परळी पीपल्सच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये ठेवीदारांनी सुमारे 11 कोटींच्या ठेवी ठेवलेल्या आहेत. मात्र, त्या पैशांचा योग्य विनियोग न झाल्याने ठेवीदारांना ठेवी परत मिळाल्या नाहीत. सोसायटीचा जनरल मॅनेजर विश्वजित ठोंबरे याला मुंबई तर प्रमोद खेडकर याला शिरूरमधून (Shirur) अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अंबादास भुसारे, लक्ष्मण हंडाळ, मंगेश खरमाळे, बाळासाहेब जंबे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com