संवत्सर येथील नामदेवरावजी परजणे पाटील सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

संवत्सर येथील नामदेवरावजी परजणे पाटील सेवा सोसायटीची निवडणूक बिनविरोध

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

संवत्सर येथील नामदेवरावजी परजणे पाटील सेवा सोसायटीच्या 13 संचालकांची बिनविरोध निवड झाली. या सर्व उमेदवारांचे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी स्वागत व सत्कार केला.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये सर्वसाधारण गटातून विवेक कृष्णराव परजणे, ज्ञानेश्वर विनायक कासार, सोमनाथ विश्वनाथ घेर, बबन पांडुरंग परजणे, बाळासाहेब गंगाधर बोरनारे, राजेंद्र वसंतराव भोकरे, विठ्ठल घनशाम लोखंडे, बबन सावळेराम भाकरे, महिला गटातून श्रीमती कल्पना अशोक कर्पे, सौ. सुरेखा रमेश निरगुडे, इतर मागासवर्ग प्रवर्गातून अविनाश पंढरीनाथ गायकवाड, अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून राजेंद्र रामचंद्र तिरमखे, भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून सुभाष डरांगे यांचा समावेश आहे.

या निवडणुकीसाठी एकूण 20 अर्ज दाखल झाले होते. पैकी सात उमेदवारांनी बुधवारी माघार घेतल्याने उर्वरीत सर्वच्या सर्व तेरा उमेदवारांची बिनविरोध निवड झाली. अर्ज मागे घेणार्‍या उमेदवरांचे संघाचे अध्यक्ष राजेश परजणे व पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे पाटील यांनी आभार व्यक्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एन. जी. ठोंबळ यांनी काम पाहिले तर याकामी त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव भानुदास वाकचौरे यांनी सहकार्य केले. निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णराव परजणे, खंडू फेपाळे, लक्ष्मणराव परजणे, लक्ष्मणराव साबळे, सोमनाथ निरगुडे, चंद्रकांत लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Related Stories

No stories found.