पारिजात चौकातील हुक्का पार्लरवर छापा

पोलिसांनी दोघांना केली अटक
file photo
file photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारिजात चौकातील (Parijat Chowk) कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर (Hookah Parlour) नगर शहर पोलिसांनी छापा (Nagar City Police Raid) टाकला. याप्रकरणी दोघांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक (Arrested) करण्यात आली आहे. पोलीस नाईक प्रदीप बडे यांनी फिर्याद दिली आहे.

सागर चंद्रकांत गायकवाड (वय 24 रा. वैदूवाडी), शाहरूख छोटोभाई शेख (वय 26 रा. नवनागापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पारिचात चौकातील (Parijat Chowk) कोहिनूर मंगल कार्यालयाजवळ हुक्का पार्लर (Hookah Parlour) सुरू असल्याची माहिती नगर शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे उपअधीक्षक कातकडे, निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके व त्यांच्या पथकातील अंमलदार यांनी हुक्का पार्लरवर शुक्रवारी दुपारी छापा (Raid) टाकला. दोघांना ताब्यात घेत अटक (Arrested) केली. त्यांच्याकडून पाच हजार 500 रुपयांचे हुक्का पार्लरचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अधिक तपास तोफखाना पोलीस (Topkhana Police) करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com