कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले

दोघांवर गुन्हा दाखल
कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी|Kopargav

हरियाना (Haryana) सोनीपथ येथुन कोपरगाव (Kopargav) येथे पार्सलने येणार्‍या सहा तलवारी (Swords) अंबड पोलिसांनी (Ambad Police) घेतल्या ताब्यात कोपरगाव येथील संशयित सचिन मोरे व हरियाना सोनीपथ येथुन तलवार पाठविणारे यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

हरियाना (Haryana) सोनिपथ येथुन कोपरगाव (Kopargav) येथे कुरियर (Courier) ने पाठविण्यात आलेले सहा तलवारचे (Swords) पार्सल अंबड पोलिसांनी अंबड औद्योगिक वसाहत परिसरातील गरवारे पॉईन्ट येथील एका कुरियरच्या कार्यालयातुन जप्त (Seized) केले असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिली याबाबत पोलिसांनी माहिती दिली, हरियाना सोनीपथ येथुन कोपरगाव येथे सहा तलवारचे पार्सल येणार आहे.

कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले
सामाईक रस्त्याच्या वादावरून तरूणाच्या पोटात चाकु भोकसला

सदर पार्सल प्रथम नाशिक अंबड एमआयडिसी वसाहत (Nashik Ambad MIDC Colony) परिसरातील गरवारे पॉईन्ट येथील एका कुरियरच्या कार्यालयात येणार असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलिसांना मिळाली. अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली औद्योगिक वसाहत पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश मुगले, पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलिस नाईक समाधान चव्हाण, दिनेश नेहे, जनार्दन ढाकणे आदींनी कुरियर कार्यालयास भेट दिली व सहा तलवार असलेले पार्सल जप्त (Courier Seized) केले. सदर पार्सल नाशिक (Nashik) येथुन कोपरगाव येथे जाणार होते या प्रकरणी अंबड पोलिसांनी कोपरगाव (Kopargav) येथील संशयित सचिन मोरे व हरियाना (Haryana) सोनीपथ येथुन तलवार (Swords) पाठविणारे यांच्यावर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले
कोण सोबत, कोण विरोधात...जिल्हा राष्ट्रवादीमध्ये संभ्रम!
कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले
मयत व्यक्तीच्या नावावरील जमिनीची विक्री; सरपंचासह सात जणांवर गुन्हा दाखल
कोपरगावला येणारे तलवारींचे पार्सल नाशिकमध्ये पकडले
जायकवाडीला पाणी सोडण्याचे यंदा संकट घोंगावणार?
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com