शेतकर्‍यांनी हवामानावर आधारीत शेती करावी

पंजाबराव डख यांचा सल्ला
शेतकर्‍यांनी हवामानावर आधारीत शेती करावी

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

निसर्ग व झाडे पावसाचे अंदाज देत असल्याने भविष्यात झाडे लावा व पृथ्वीचे तापमान कमी करून निसर्गाच्या विरोधात जाऊन शेती करू नका, असा सल्ला महाराष्ट्रातील हवामानाबाबत अचूक अंदाज देणारे शेतकर्‍यांचे मित्र पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी दिला.

वांबोरी (Vambori) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे अध्यक्षस्थानी होते. यावेळी बि. टी. गोरे, सोनई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, कृषिभूषण सुरसिंगराव पवार, माजी सभापती भानुदास नवले, हृषिकेश मोरे, बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक प्रभाकर पानसंबळ, सुरेश बाफना आदी उपस्थित होते.

पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी आपल्या भाषणात उपस्थित शेतकर्‍यांना पाऊस व हवामान विषयावर सविस्तर माहिती देऊन पुढील पाऊस कधी पडेल याची माहिती दिली. या महिन्यात 3, 4, 5 रोजी वातावरण ढगाळ राहील. तर 12, 13, 14 रोजी तुरळक पाऊस होईल. पुढील वर्षी सन-2023 ला 8 जूनला पाऊस येणार असला तरी चांगले पाऊस 22 जून ते 28 जून, 10 जुलै पासून ते 18 व 19 जुलैला जोरदार पाऊस असेल. 16 ते 19 सप्टेंबर 2023 80 टक्के भागात पाऊस होईल तर 26 ऑक्टोबर 23 पासून थंडी पडेल. दरवर्षी 21, 22 मे पासून अंदमान पासून पाऊस सुरु होतो.

पावसाचे अंदाज सांगण्यास इयत्ता 8 वी मध्ये असताना सुरु केला. शेती व्यवसायाबरोबर समाज शेतकरी यांच्यासाठी रात्रंदिवस मदत करून आज नुकसान झाले म्हणून शेतकरी कधीचं शेती सोडत नाही. कोरोनाच्या महामारीत सर्व उद्योगधंदे, कंपन्या बंद होते पण शेतीधंदा बंद नव्हता. भविष्यात सगळे उद्योग बंद पडले तरी शेती व मेडिकल बंद पडणार नाही.

गेली काही वर्ष वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर झाल्याने काही वर्ष पाऊस कमी पडत होता. देशात राज्यात हवामान अंदाज सांगणार्‍या अनेक संस्था होत्या पण त्यांनी कधीच अचूक अंदाज वर्तवला नाही. निसर्ग भविष्यात शेतकर्‍यांचे मागे उभा राहिला तर शेतकर्‍यांचे नुकसान होणार नाही. शेतकर्‍यांनी हवामानावर आधारित शेती करावी, असा सल्ला यावेळी पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी यावेळी दिला.

प्रास्ताविक सुमित बाफना यांनी केले. याप्रसंगी मच्छिंद्र सोनवणे, रावसाहेब गडाख, भागवतराव पागिरे, किसनराव जवरे, गंगाधर जाधव, दत्तात्रय शेळके, नामदेवराव येवले, धोंडीभाऊ शिंदे, व्यापारी सुभाष सावज, प्रमोद बजाज, राजेंद्र भराडिया, संतोष सुराणा, वर्धमान पारख, दिलीप चोरडिया, आदींसह शेतकरी, व्यापारी वर्ग उपस्थित होता. माजी सरपंच नितीन बाफना यांनी आभार तर अप्पासाहेब ढोकणे यांनी सूत्रसंचालन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com