<p><strong>अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar</strong></p><p>पंढरपूर विधानसभा मतदारसंघाची पोट निवडणूक होत असून माजी मंत्री राम शिंदे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. </p>.<p>उमेदवारीसाठी राम शिंदे मुंबईत तळ ठोकून आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही त्यांच्या उमेदवारीसाठी अनुकूल असल्याचे सांगण्यात येते. या मतदारसंघात धनगर समाजाची मते जादा असल्याने त्याचा लाभ उठविण्यासाठी भाजपाकडून ही रणनिती आखली जात आहे.</p>