
नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa
नेवासा तालुक्यातील पांढरीपूल येथे एसटी बसने कारला मागून धडक दिल्याने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली असून याबाबत सोनई पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीवरून एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शंतनू पंडीत घाडगे (वय 22) रा. बीड यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास औरंगाबाद- नगर मार्गाने कारमधून (एमएच 14बीके 0912) जात असताना पांढरीपूल येथे मागून आलेल्या एसटीबसने (एमएच 14 बी 5001) धडक दिल्याने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले तसेच कारचे नुकसान झाले.
या फिर्यादीवरून एसटी बस चालकावर अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.