पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

पंचायत राज मंत्रालयाचे सचिव सुनील कुमार यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

पारनेर | तालुका प्रतिनिधी

भारत सरकार (Government of India) सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाचे (Panchayat Raj Mantralay) सचिव सुनील कुमार (Sunil Kumar) यांनी ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे (Anna Hazare) यांची आज सकाळी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली.

यावेळी सुनील कुमार यांनी अण्णांशी ग्रामीण विकास, जलसंधारण अश्या विविध विषयांवर चर्चा केली. सुनील कुमार हे आज अहमदनगर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते आज गुहा ग्रामपंचायत, ता. राहुरी येथे क्षेत्रीय भेट देऊन सायंकाळी शिर्डी येथे साई बाबांचे दर्शन घेऊन दिल्लीसाठी रवाना होणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com