Jayakwadi Dam : जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू; धरणातील पाणीसाठा किती?

Jayakwadi Dam : जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू; धरणातील पाणीसाठा किती?

पैठण | प्रतिनिधी

जायकवाडी धरणाच्या (Jayakwadi Dam) ऊर्ध्व भागातील अकरा धरणे व दोन बंधाऱ्यात नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला असून यापैकी ७ धरण व एका बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे येणाऱ्या २४ तासात जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. सध्या धरणात २३००० क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक होत असून धरणात ६१ टक्के पाणीसाठा जमा (Jayakwadi water storage) झाला आहे.

मागच्या दोन आठवड्यापासून राज्यात सर्वदूर पाऊस पडत आहे. तसेच जायकवाडी धरण (Jayakwadi water storage update) व जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस पडत आहे. परिणामी, जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील एकूण २५ लहान मोठ्या धरणांपैकी ११ धरणात ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा जमा झाला असून यापैकी ५ धरणे शंभर टक्के भरली आहे. सध्या, जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील नाशिक व नगर जिल्ह्यातील ११ धरणातून व नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती जायकवाडी धरण प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Jayakwadi Dam : जायकवाडीत मोठ्या प्रमाणात आवक सुरू; धरणातील पाणीसाठा किती?
Video : रंधा फॉलचे विहंगम, नयनरम्य दृश्य

सध्या, जायकवाडी धरणात २३५६६ क्यूसेक प्रमाणे पाण्याची आवक सुरू आहे. वरील धरणे व बंधाऱ्यातून सोडण्यात आलेला पाणीसाठा येणाऱ्या चोवीस तासात जायकवाडी धरणात पोहचणार आहे. यामुळे, चोवीस तासानंतर जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचा अंदाज जायकवाडी धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे. सध्या, जायकवाडी धरणाची पाणीपातळी १५१३.९७ फुटावर पोहचली आहे. तर धरणात २०५३.३६४ दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा जमा झाला असून यापैकी १३१५.२५८ दशलक्ष घनमीटर एवढा उपयुक्त (६०.५७ टक्के) साठा आहे.

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील शंभर टक्के भरलेली धरणे

भावली - १००

भंडारदरा -१००

वालदेवी -१००

भाम - १००

आळंदी -१००

जायकवाडी धरणाच्या ऊर्ध्व भागातील नव्वद टक्क्यांपेक्ष जास्त भरलेली धरणे

वाघड - ९३.८३

पालखेड - ९५.५८

गंगापूर - ९७.६९

गौतमी - ९०.५०

कडवा - ९९.१७

निळवंडे - ९४.८१

दारणा - ९७.५५

ऊर्ध्व भागातील धरणे व बंधाऱ्यातून केला जाणार विसर्ग

पालखेड - ४३२ क्यूसेक

गंगापूर -४००१ क्यूसेक

कडवा - २५४४ क्यूसेक

भावली - ९४८ क्यूसेक

भंडारदरा - १३९८२ क्यूसेक

निळवंडे - १९४५७ क्यूसेक

दारणा -१२७८८ क्यूसेक

नांदूर मधमेश्वर बंधारा - २०८२३ क्यूसेक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com