भरधाव कार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

भरधाव कार व मोटारसायकलचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

पैठण |प्रतिनिधी| Paithan

पैठण (Paithan) शहरालगत असलेल्या पैठण-पाचोड रस्त्यावर (Paithan Pachod Road) बुधवारी दुपारी भरधाव कार व मोटारसायकलचा भीषण अपघात (Car Bike Accident) झाला. यामध्ये मोटारसायकलवरील दोघांचा मृत्यू (Death) झाला. समोरासमोर झालेला हा अपघात इतका भीषण होता की कार (Car) रस्त्याच्या बाजुला असलेल्या खड्ड्यावरुन उडून एका शेतात जावून कोसळली.

याबाबत माहिती अशी की, बुधवारी दुपारी पैठण (Paithan) पाचोड रस्त्यावर उत्तमराव जाधव यांच्या शेताजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास रस्त्यावरुन भरघाव वेगात जात असलेल्या कार क्रमांक एम.एच.20 बीएन 9114 व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली. रस्त्याच्या कडेला केबल टाकण्याचे काम सुरु असल्याने खड्डा (Pit) खोदण्यात आलेला आहे. जोरदार धडकेमुळे मोटारसायकल खड्ड्यात (Pit) तर कार मातीच्या ढिगार्‍यावर उडून बाजूच्या शेतात जावून कोसळली. या अपघातात (Accident) मोटारसायकलवरील प्रकाश गवळी (रा. पहाडसिंगपुरा औरंगाबाद) व शमशोद्दीन अन्सारी (रा. परिहारा झारखंड) यांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहीती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दशरथ बुरकुल, पो.का. गोपाल पाटील, श्रीराम चेडे, मुकुंद नाईक, भगवान धांडे, राम मोकळे, स्वप्निल दिलवाले, राजु जिवडे तसेच जिल्हा ग्रामीण वाहतुक शाखेच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना रुग्णालयात हलविले. दरम्यान कारमधील प्रवाशी अपघातानंतर फरार झाले होते. पोलिसांनी पंचनामा करुन अपघाताची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com