पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा गणपती

पद्मश्री राहीबाई पोपेरेंनी साकारला अस्सल गावरान बियांचा गणपती

अकोले |प्रतिनिधी| Akole

देशभर गणपती बाप्पांचे आगमन मोठ्या जोशात होत असताना बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांनी आपल्या राहते घरी अस्सल गावठी बियाण्यांपासून (Gavran Seeds) बनवलेल्या गणरायांचे (Ganesh) सुंदर प्रतीक साकारलेले आहे. मनोभावे पूजा करत या गणरायांची स्थापना त्यांनी आपल्या बीज बँकेत (Seeds Bank) मोठ्या थाटात केलेली आहे.

गावठी बियाण्यांच्या संवर्धनातून (Conservation of Gavran Seeds) शेतकर्‍यांसाठी मोठी चळवळ उभी करणार्‍या बीजमाता राहीबाई पोपेरे (Padmashri Rahibai Popere) यांनी वाल, भात, नागली, वरई, भोपळा, मूग, उडीद, आबई, कारली, दोडका इत्यादी गावठी बियांचा वापर करून गणपतीची प्रतिकृती निर्माण केली आहे. प्रदूषणमुक्त व पर्यावरणयुक्त गणरायांची स्थापना व गणेशोत्सव साजरे करण्याचे विनम्र आवाहन त्यांनी देशवासियांना केले आहे. या गणरायांना पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे.

प्रत्येक कृतीतून पर्यावरण आणि शेतकरी यांच्यासाठी कार्य करणार्‍या पद्मश्री राहीबाई यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या गणरायाला सर्व भाविक शेतकरी आदराचे स्थान देत आहेत. गणराजाला सर्व समाज तसेच मुख्यत्वे शेतकरी आनंदी आणि सुखी ठेवण्याची प्रार्थना त्यांनी केली आहे. पद्मश्री राहीबाई यांच्या कार्याची दखल बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेने घेऊन त्यांचे काम जगापुढे नेले आहे. संस्थेचे रिजनल डायरेक्टर व्ही.बी. द्यासा तसेच राज्य समन्वयक सुधीर वागळे यांनी सर्व गणेश भक्तांना बीजरुपी निसर्गमय शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com