राजकारणापासून दूर राहिल्याने ग्रामविकासाचे स्वप्न साकार

पद्मश्री पोपटराव पवार : हिवरेबाजारकडून मानपत्र देऊन सत्कार
राजकारणापासून दूर राहिल्याने ग्रामविकासाचे स्वप्न साकार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनेक निवडणुकांमध्ये मोठ्या राजकीय ऑफर मिळत होत्या, पण राजकारणापासुन दूर राहण्याचा निर्णय घेऊन गावसुधारण्यावर भर दिला. यामुळेच हिवरेबाजार मध्ये ग्रामविकासाचे स्वप्न साकार झाले. गेली 3े वर्ष गावकर्‍यांनी दगडधोंडें उचलत जे अविरत श्रमदान केले त्या गावकर्‍यांची मला पद्मश्री पुरस्कार स्विकारताना आठवण झाली. गावकर्‍यांची नेहमी मिळणारी ऊर्जा माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली, असे भावविवश उदगार पद्मश्री पोपटराव पवार यांनी काढले.

पवार यांना राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. बुधवारी हिवरेबाजार गावाच्यावतीने त्यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवगड संस्थानचे भास्करगिरी महाराज, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार निलेश लंके, माजी आ. साहेबराव दरेकर , नगराध्यक्षा दुर्गा तांबे ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ता काकडे, अशोकराव खरात, प्रा. शशिकांत गाडे, संदेश कार्ले, माधवराव लामखडे, काशिनाथ दाते, सरपंच विमल ठाणगे आदी उपस्थीत होते.

यावेळी पद्मश्री पवार म्हणाले की, क्रिकेटने मला सहनशिलता शिकवली तीच शिदोरी मला हिवरे बाजारचा कायापालट करण्यात उपयोगी पडली. येत्या काही वर्षात राज्यात 500 गावे हिवरे बाजार, राळेगणसिध्दी प्रमाणे आदर्श होणार आहेत. पाण्याचा ताळेबंद केल्यानेच हिवरेबाजारने दुष्काळावर मात केली. पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्यानेच पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करणार आहे. आता गावांच्या मालकीची शेततळी करून समन्यायी पध्दतीने पाणी वाटपाचे धोरण स्विकारावे लागणार आहे. गाव बिघडण्याचे प्रमुख कारण भाऊकीतील वाद असतात. यामुळे राज्य सरकारने स्वखर्चाने सर्व जमिनी मोजण्याची संकल्पना राबवायला हवी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com