पद्मश्री डॉ. विखे यांचा जयंती दिन शेतकरी दिन म्हणून साजरा करणार

पद्मश्री डॉ. विखे यांचा जयंती दिन शेतकरी दिन म्हणून साजरा करणार

लोणी | प्रतिनिधी

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील (Padmashri Dr. Vitthalrao Vikhe Patil) यांचा जयंती दिन हा शेतकरी दिन (Farmers' Day) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षीच राज्याच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास (Department of Agriculture, Animal Husbandry, Dairy Development) व मत्सव्यवसाय विभागाच्या (Department of Fisheries) वतीने शेतकर्‍यांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि शेतकर्‍यांचा सन्मान या निमित्ताने केला जातो.

पद्मश्री डॉ. विखे यांचा जयंती दिन शेतकरी दिन म्हणून साजरा करणार
ध्येयवेड्या प्रणाली चिकटेचा १० हजार किमीचा थक्क करणारा प्रवास...

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचा तिथीप्रमाणे येणारा जन्मदिवस हा शेतकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला आहे. त्यानुसार दरवर्षी शासनाच्यावतीने त्याची अंमलबजावणी केली जाते. यंदा कोविड संकटाच्या पार्श्‍वभूमीवर या शेतकरी दिनाच्या निमित्ताने ऑनलाईन वेबिनार तसेच शेतकर्‍यांसाठी मार्गदर्शन वर्ग आयोजित करण्याच्या सुचना शासनाने कृषि विभागाला दिल्या आहेत.

शेतकरी दिनाच्या निमित्ताने जिल्हा स्तरावर तसेच ग्रामपंचायत स्तरावर शेतकर्‍यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. प्रगतीशिल शेतकर्‍यांचा सन्मान या निमित्ताने विविध ठिकाणी होणार असून स्थानिक लोकप्रतिनिधींसह जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषि शास्त्रज्ञ, प्रगतिशिल शेतकरी यांच्या सहभागाने हा कृषि दिन सर्वत्र साजरा करण्याचे निर्देश शासनाने निर्गमित केले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com