साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा

साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची विखे कारखान्यास भेट
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर द्यावा

राजुरी |वार्ताहर| Rajuri

सहकारातील साखर कारखानदारांनी कारखान्यात इथेनॉल सारखे नवीन बायप्रॉडक्ट (New byproducts like ethanol) तयार करण्यासाठी प्रयत्न करावेत. येणारा काळ साखर कारखानदारीसाठी उज्ज्वल (Bright for the sugar industry)असून नवीन बायप्रॉडक्टपासून कारखाना व्यवस्थापनाला व शेतकर्‍यांना त्याचा चांगला फायदा होईल, असे प्रतिपादन साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad) यांनी केले.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्यास (Padma Shri Dr. Vitthalrao Vikhe Patil Sugar factory) राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड (Sugar Commissioner Shekhar Gaikwad Visit) यांनी भेट दिली. त्यांनी प्रथम पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील (Padma Bhushan Balasaheb Vikhe Patil) यांच्या स्मृतिस्थळावर जाऊन पुष्पचक्र अर्पण केले. यानंतर कारखाना संचालक व अधिकारी यांचे समवेत दोन ते अडीच तास कारखान्याच्या विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विश्वास कडू, प्रादेशिक सहसंचालक मिलिंद भालेराव, विशेष लेखापरीक्षक राजेंद्र देशमुख, कारखान्याचे कार्यकारी संचालक टी. आर. ढोणे, गणेशचे कार्यकारी संचालक ए. के. भागडे, जनरल मॅनेजर ए. वाय. पानगव्हाणे, फायनान्स मॅनेजर सी. आर. गायके, संजय असावा, सरोज परजणे आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड म्हणाले की, कारखान्याच्या व्यवस्थापनाने पद्मश्रीच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थापनेपासून आतापर्यंत अखंड साखर कारखानदारी यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. याचे श्रेय पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील, माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील (MLA Radhakrushan Vikhe Patil) यांना द्यावे लागेल. त्यापाठोपाठ खा. डॉ. सुजय विखे पाटील (MP Sujay Vikhe Patil) यांनीही पदाधिकारी, अधिकारी व शेतकर्‍यांची अशी मोट बांधून प्रगती चालू ठेवली आहे ही कौतुकाची बाब आहे. कारखान्यांनी साखरेच्या उत्पादनावरच अवलंबून न राहता कारखान्यातून मिळणार्‍या उपपदार्थापासून विविध प्रॉडक्ट इथेनॉल तयार करून ते विक्रीसाठी मार्केटमध्ये आणल्यास सहकारी साखर कारखान्यांना नक्कीच उज्ज्वल भविष्य प्राप्त होईल व त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकरी कामगार यांना झाल्याशिवाय राहणार नाही, असेही ते म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com