पढेगाव येथून 30 गोण्या सोयाबीनची चोरी

पढेगाव येथून 30 गोण्या सोयाबीनची चोरी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव येथील एका घरासमोरील पोर्चमध्ये ठेवलेली 30 गोणी सोयाबीनची चोरी अज्ञात चोरट्यांनी केली. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील पढेगाव येथील बाळासाहेब रामचंद्र बंगाळ यांच्या घरासमोरील पोर्चमध्ये ठेवण्यात आलेल्या 30 गोण्या सोयाबीनची चोरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी बाळासाहेब रामचंद्र बंगाळ यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं. 454/2022 प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुध्द भादंवि 379 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com