पाडळी रांजणगावचे 140 सभासद अपात्रच

पाडळी रांजणगावचे 140 सभासद अपात्रच

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील पाडळी रांजणगाव सेवा संथेच्या 140 सभासदांना वगळण्याचा सहायक निबंधकांचा निर्णय कायम ठेवत जिल्हा उपनिबंधक यांनी विरोधकांचे 11 आरोपही फेटाळले आहेत. पाडळी रांजणगाव विविध कार्यकरी सेवा सोसायटीचा मतदार यादीचा कार्यक्रम सुरू असून यावर काही सभासदांनी घेतलेल्या सुमारे 11 हरकती जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी निकाली काढल्या आहेत.

पाडळी रांजणगाव सेवा संस्थेने सहाय्यक निबंधक सहकारी संस्था पारनेर यांच्या आदेशाने व महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 11 व 25 अन्वये 140 बिगर खातेदार सभासदांना अपात्र केले होते. हे सभासद पुन्हा समाविष्ठ करावेत अशी हरकत विरोधकांनी घेतली होती. तसेच प्रारूप मतदार यादीतील 150 सभासद हे बोगस व क्षेत्र नसलेले असून ते कमी करावेत अशी हरकत घेण्यात आली होती. परंतु अहर्ता दिनांक नंतर झालेले सचिव यांच्या नजरचुकीने पात्र ठरलेले फक्त 32 सभासद कमी करण्याचा आदेश जिल्हा उपनिबंधक यांनी दिला आहे. अशी माहिती चेअरमन आशाबाई करंजुले यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.