पाचेगाव उपकेंद्रात कोविड लसीकरणाची मागणी

पाचेगाव उपकेंद्रात कोविड लसीकरणाची मागणी

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातीलपाचेगाव उप आरोग्य केंद्रामध्ये कोविड 19 ची लस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आली आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचेगाव येथील नागरिकांनासाठी नेवासा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड 19 लसीकरण ठेवण्यात आले आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक पहाटेपासून केंद्रात नंबर लावीत आहे. पण पहाटे जाऊन गावातील नागरिकांना लस मिळत नाही तसेच स्थानिक पातळीवर आरोग्य केंद्रात मोठी वशिलेबाजी होत असल्याचा आरोप आहे.

सर्वच ज्येष्ठ नगारिक नेवासा बुद्रुकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून लस घेवू शकत नाहीत. त्यामुळे पाचेगाव उपकेंद्रात आठवड्यातील एक दिवस लसीकरण उपलब्ध करून देण्यात यावे.

आम्ही गावातील उप आरोग्य केंद्रात कोविड 19ची लस मिळावी याकरीता जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याबरोबर संपर्क करून विनंती केली. अधिकार्‍यांनी लस उपलब्ध होताच उपकेंद्रात लसीकरण सुरु करण्याची ग्वाही दिली.

- श्रीकांत पवार उपसरपंच

गावात करोना बधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असतानो भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत जर आरोग्य अधिकारी मदत करीत नसतील तर आरोग्य विभागाचा उपयोग काय? असा प्रश्न गावातील नागरिक उपस्थित करीत आहे.

- अशोकराव नांदे सामाजिक कार्यकर्ते

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com