पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला

लांबलेल्या पावसाळ्यामुळे मशागतीला विलंब; रब्बी पिकांच्या उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता
पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव, कारवाडी, पुनतगाव मध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे खरीप हंगामाची दाणादाण उडाली. अति पावसाने जमिनी अक्षरश शेवाळून जमिनीने ओलावा धरला. त्यात ओलावा काही कमी होत नसल्याने रब्बी हंगामात पिके घेण्यासाठी जमिनीची मशागत करता येत नाही. त्यात उन्हाळी कांदा लागवडीसाठी विलंब होऊन शेतकर्‍यांना कांदा उत्पादनामध्ये मोठा फटका बसणार असल्याची चिन्हे या भागात दिसू लागली आहेत.

पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला
राष्ट्रवादीने 40 पेक्षा कमी संख्या होऊ नये, एवढेच पाहावे

या भागात रब्बी हंगामात प्रामुख्याने कांदा, गहू, हरभरा व थोडेफार क्षेत्रावर ज्वारी अशी पिके घेतली जातात. या भागात जमिनी अतिपावसाने झालेली ओल सोडण्यास तयार नाही. त्यामुळे कांदा रोपे देखील उशीर पडली असून कांदा लागवडीला देखील उशीर होणार आहे. त्यात उत्पादनातदेखील घट दिसून येईल.

गहू पेरणी सर्वसाधारणपणे नोव्हेंबरमध्ये होते. मात्र पाऊस लांबल्याने पेरणीपूर्व मशागत या महिन्यात सुरु आहे. मशागतीला उशीर झाल्याने रब्बी हंगामातील पिके उशिराने घेतली जाणार आहेत.

पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला
लम्पी संसर्गाने चिंता वाढविली

यंदा पावसाळा चांगला होऊन पाणी पातळी देखील चांगली आहे. पण जमिनी नीट करण्यासाठी शेतकरी प्रयत्न करीत असताना शेतकर्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या भागात यावर्षी कपाशी क्षेत्र देखील मोठ्या प्रमाणात झाले.पावसाने आता उघडीप दिली असली तरी दोन वेचण्यातच कपाशी क्षेत्र उलगडून जाईल.कारण बर्‍यापैकी शेतकर्‍यांच्या म्हणजे आगास कपाशी वेचण्या झाल्या, पण उशीर लागवडी कपाशीच्या एक-दोन वेचण्यात या भागातील कापूस संपले असे चिन्हे दिसत आहे.

पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला
रब्बी हंगामासाठी 88 हजार हेक्टरवर पेरण्या

जमिनी ओलावा धरून असल्याकारणाने कांदा लागवडीसाठी डिसेंबरची अखेर किंवा जानेवारी उजाडेल अशी परिस्थिती या भागात निर्माण झाली आहे.शेतकर्‍यांनी जमीनीची नांगरट सुरू केली आहे, पण जमिनी ओल्या असल्याने नांगरट मध्ये जमिनीच्या मातीच्या चिपा निघत आहे. मग जमिनीची मशागत कधी होणार? कधी जमिनी भुसभुशीत होणार? मग पिकांच्या पेरण्या व लागवडी कधी होणार? असे अनेक प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

या भागात थंडी देखील चांगली पडली आहे, रब्बी हंगामातील पिकांना थंडी उपयुक्त असते पण जमिनी नीट होत नसल्याने शेतकर्‍यांना या थंडीचा फायदा होताना दिसत नाही.

पाचेगाव परिसरात गहू, हरभरा व कांदा लागवडीसाठी शेतकरी मशागतीच्या तयारीला
सलाबतपूर परिसर भुरट्या चोर्‍यांनी त्रस्त

यंदा या भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडून खरीप हंगामातील पिके वाया गेली. त्यात शेतकर्‍यांच्या खात्यात तुटपुंजी रक्कम जमा करून विमा कंपन्यांनी हेळसांड केली. त्यानंतर महसूल व कृषी खात्याने शेतकर्‍यांच्या नुकसान पिकांचे पंचनामे केले. त्याचेशासकीय अनुदान देखील शेतकर्‍यांना दिवाळी सणाच्या अगोदर अपेक्षित होते, पण ते देखील अद्याप मिळालेले नाही. कमीत कमी रब्बी हंगामातील पिके घेण्यासाठी तरी शासकीय अनुदान शेतकर्‍यांच्या बँक खात्यात लवकर जमा करावे अशी अपेक्षा आहे.

- जालिंदर विधाटे शेतकरी, पाचेगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com