पाचेगाव शिवारात विहिरीतील वीजपंपाची चोरी

गुन्हा दाखल
पाचेगाव शिवारात विहिरीतील वीजपंपाची चोरी

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगावच्या शिवारातील शेतातील विहिरीमधील वीजपंप चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचेगाव येथील नसीर अकबर शेखी यांची गट नंबर 180/3मध्ये शेतजमीन आहे. या जमिनीमधील विहिरीत पाणी उपसण्यासाठी पाच अश्वशक्तीचा पाणबुडी वीजपंप (मोटार) बसविलेला होता. 5ऑक्टोबर रोजी दुपारी ते पिकास देण्यासाठी विहिरीवर वीजपंप चालू करण्यासाठी गेले असता विहिरीवर मोटारचे पाईप जमिनीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसले.

विहिरीत वीज मोटार दिसून आली नाही. त्यावरुन वीज मोटारीची चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत दिलेल्या फिर्यादीवरुन नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे अज्ञात व्यक्तीवर चोरीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्टेबल किशोर काळे करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com