पाचेगाव परिसरातील सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव

वेचून काढल्या तरीही वाढत्या संख्येने शेतकरी त्रस्त
पाचेगाव परिसरातील सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा (Newasa) तालुक्यातील पश्चिमेकडे असणार्‍या पाचेगावमध्ये (Pachegav) सध्या शेतकर्‍यांच्या सोयाबीन पिकांवर (Soybean Crop) गोगलगाय (Snail) ताव मारीत पिके फस्त करण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी चांगले आणलेले सोयाबीन पीक (Soybean Crop) जमीनदोस्त करीत असल्याने शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

पाचेगाव येथील विजय लक्ष्मण उंडे यांची गट नंबर 272 मध्ये शेती आहे.त्यांनी खरीप हंगामात (Kharif Season) दोन एकर क्षेत्रात सोयाबीन पीक (Soybean Crop) घेतले आहे. पीक देखील जोमाने आले, मात्र सोयाबीन पिकांवर गोगलगाय (Snail) ताव मारीत पिकांची मोठी नासाडी करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी या गोगलगायीने हैराण झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या सोयाबीन पिकामधील (Soybean Crop) गोगलगाय अक्षरशः वेचून काढले तरी गोगलगाय काही कमी होण्याचे नाव घेईना.

पाचेगाव परिसरातील सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव
निळवंडेत किती टक्के पाणी; वाचा सविस्तर

अलीकडील वर्षांत गोगलगायीचे (Snail) प्रमाण एवढे वाढले आहे की गवतसुद्धा त्यांच्या उपजीविकेसाठी कमी पडू लागले आहे. त्यामुळे विविध पिकांवर त्यांचे अतिक्रमण होऊन शेतकर्‍यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. एकात्मिक व सामूहिक पद्धतीने गोगलगायीचे नियंत्रण करणे गरजेचे झाले आहे असून गोगलगायींवर चांगला प्रतिबंध उपाय निघाला पाहिजे. जेणेकरून या गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी मदत होईल असे या भागातील शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

गोगलगायी (Snail) जून ते सप्टेंबर या काळात जास्त प्रमाणत पिकांत व इतरत्र दिसून येतात. पावसाचे वातावरण त्यांना अनुकूल होत असल्याने त्यांचा प्रादुर्भाव पिकांवर व गवतावर देखील दिसून येतो. त्यामुळे शेतकर्‍यांनी काय उपयोजना करावी याबाबत कृषी विभागाकडून (Agriculture Department) माहिती देऊन पिकांवरील गोगलगायींचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मार्गदर्शन करावे अशी अपेक्षा गावातील शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

पाचेगाव परिसरातील सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव
मुळात 943 दलघफू पाण्याची आवक
पाचेगाव परिसरातील सोयाबीनवर गोगलगायींचा प्रादुर्भाव
धोंड्याच्या महिन्यामुळे जावईबापू जोमात!
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com