पाचेगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एक एकर ऊस जळाला

पाचेगाव येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत एक एकर ऊस जळाला

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव (Pachegav) येथे शॉर्टसर्किटने (Shortcircuit) लागलेल्या आगीत तोडणीला आलेले एक एकर उसाचे (Sugarcane Fire) क्षेत्र खाक झाले. बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली.

गणेश बबन तुवर यांची पाचेगाव ते पाचेगाव फाटा रस्त्यालगत (Pachegav Phata) शेती असून शेतात दीड एकर उसाचे क्षेत्र आहे. बुधवारी विजवाहक तारांमध्ये झालेल्या घर्षणाने उसाला आग लागली. यात अर्धा एकर उसाचे (Sugarcane) क्षेत्र आगीपासून वाचविण्यात शेतकर्‍यांना व ग्रामस्थांना यश आले. मात्र एक एकर क्षेत्र आगीत खाक झाले. यात शेतकर्‍यांचे अंदाजे एक लाखाचे नुकसान झाले आहे. मागील आठवड्यात देखील चार शेतकर्‍यांचे अडीच एकर उसाचे क्षेत्र आगीत जळाले होते.

आग विझविण्यासाठी गावातील जवळपास 30ते 35 तरुण शेतकर्‍यांनी मदत केली, यात जालिंदर विधाटे, सुभाष तुवर, राहुल तुवर, अभिषेक शिंदे, सुभाष तुवर, गणपत माळी, संदीप नांदे, गोविंद नांदे, दत्तात्रय विधाटे, बालू तुवर, सचिन तुवर, अनिकेत तुवर,किशोर राऊत, संदीप देसाई, भैय्या सय्यद, अनिल कुचेकर आदींसह शेतकर्‍यांनी अथक प्रयत्न करून ऊस विझून पुढील अनर्थ टाळण्यासाठी मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com