पाचेगाव येथील प्रवरा नदी झाली वाहती

शेतकर्‍यांना दिलासा
पाचेगाव येथील प्रवरा नदी झाली वाहती

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील प्रवरा नदी वाहती झाली असून नजिकच्या भविष्यातील पाणी प्रश्न मिटणार असल्याने शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. निळवंडे धरणातून तीन हजार क्युसेकने प्रवरापात्रात पाणी सोडण्यात आले आहे.

हे पाणी आता नेवासा तालुक्यातील पाचेगावमधून पुढे निघाले आहे. वरील धरणं ऑगस्टमध्ये भरतात व त्यानंतर पाणी सोडले जाते मात्र यावर्षी धरण माथ्यावर सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत असल्याने धरणाचा साठा वाढत असल्याने त्यामुळे प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात धरणातून पाण्याचे रोटेशन वेळेत मिळणार असल्याने या भागातील शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंद पाहायला मिळत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com