पाचेगावात पंतप्रधान आवास योजना यादी सर्वेक्षणाकडे तलाठी, कृषी सहायकांनी फिरवली पाठ

सर्वेक्षण पूर्ण होण्यास होतोय विलंब
पाचेगावात पंतप्रधान आवास योजना यादी 
सर्वेक्षणाकडे तलाठी, कृषी सहायकांनी फिरवली पाठ

पाचेगाव |वार्ताहर|Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव मध्ये सध्या प्रधानमंत्री आवास प्लस (ड यादी) सर्व्हेक्षण चालू आहे.पण या सर्वेक्षण साठी गावाला लाभलेले तलाठी, कृषी सहाय्यक व सोसायटीचे सचिव यांनी या सर्व्हेक्षणाकडे पाठ फिरवून जबाबदारी झटकल्याने या कामास विलंब होत आहे.

ही यादी 31डिसेंबर 2021 ला शंभर टक्के पूर्ण करून देणे बंधनकारक होते, पण काही कर्मचार्‍यांनी या सर्वेक्षण यादी पासून दूर राहण्याचा पवित्रा घेतल्यामुळे जानेवारी 2022 अर्धा संपला तरी सर्वेक्षण पूर्ण होऊ शकले नाही. पाचेगावत एकूण 363 प्रधानमंत्री आवास प्लस ड सर्वेक्षण पात्र कुटुंब आहेत. त्यात जवळपास 154 कुटुंबाच्या सर्व्हेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. या आठवड्यात काम पूर्ण होईल अशी आशा ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाहूरवाघ यांनी व्यक्त केली.

या सर्वेक्षणासाठी नेवासा बुद्रुक जिल्हा परिषद ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक के. एल. उस्ताद, ग्रामविकास अधिकारी एस. एम. वाहूरवाघ, अंगणवाडी सेविका श्रीमती एम. बी. धाकतोडे हे प्रत्यक्ष काम करीत आहे. पण कामगार तलाठी, कृषी सहाय्यक, सोसायटीचे सचिव अद्याप या सर्वेक्षण कामी उपस्थित नाहीत.तसेच कामगार तलाठी यांनी अद्याप अडीच एकर जमीनधारक कुटुंबाची यादी सर्वेक्षण कमिटीस दिलेली नाही. तसेच सोसायटीचे सचिव यांनीही पन्नास हजार किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचे क्रेडीट कार्ड यादीही कमिटीस अद्याप दिलेली नाही. त्यामुळे या सर्वेक्षण कामासाठी अडचणी निर्माण होत आहे.

या कमिटीने गटविकास अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करून आम्हाला या सर्वेक्षण यादी करण्याकामी इतर कर्मचारी उपस्थित करून देण्यात यावे अशी मागणी केली होती, पण तरी देखील या कमिटीला इतर कर्मचार्‍यांची मदत अद्याप मिळालेली नाही. त्यामुळे या कर्मचार्‍यांनी आपले काम सुरू ठेवले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com