पाचेगावच्या ग्रामसभेत वाचला प्रमुख समस्यांचा पाढा

मात्र अन्य विषयांवरच झाली अधिक चर्चा
पाचेगावच्या ग्रामसभेत वाचला प्रमुख समस्यांचा पाढा

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे आयोजित ग्रामसभेत ग्रामस्थांनी गावातील अनेक प्रश्न मांडले. मात्र अन्य विषयांवरील चर्चेतच अधिक वेळ गेल्याने मुख्य विषयांवरील चर्चेला कमी वेळ मिळाला. सरपंच संगीता कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ग्रामसभा पार पडली.

यावेळी ग्रामसभेत वाळू ठरावाचा अभिप्राय मागणे, जॉब कार्डांसाठी शिबिर घेणे, घरकुल भोगवटा धारकांना नियमानुकूल ठराव घेणे, भोगवटा सदरातील जागेची मोजणी ठराव घेणे, ग्रामसभेला कायमस्वरूपी गैरहजर राहणार्‍या शासकीय कर्मचार्‍यांना नोटीस बजाविण्याबाबत ठराव, गावातील कोणता रस्ता कोणत्या ठेकेदारांनी केला यांचा बोर्ड लावण्याबाबत ठराव, गावातील जिल्हा परिषद शाळेच्या जमिनीची मोजणी करणे, 163 अपात्र नागरिकांचे फेरसर्व्हेक्षण तसेच ग्रामदैवत गहिनीनाथ महाराज देवस्थानचे काम लवकरात लवकर पूर्ण करणे असे प्रश्न मांडण्यात आले. पण अन्य विषयांवर चर्चा झाल्यामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली नाही.

गावातील चारशे महिला एकत्र येत जवळपास तीस बचत गट स्थापन केल्याने उद्योग व घरखर्चास मोठी मदत मिळणार आहे.

गावात जागोजागी शौचालय उपलब्ध करून द्यावे, गावात बसस्टॅण्ड उपलब्ध करावे. गावातील उपकेंद्रामार्फत लसीकरण करून घ्यावे. गावामध्ये शेतकर्‍यांच्या गाय, बैल, शेळ्या, मेंढ्या व कोंबड्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे गावात पशुवैद्यकीय दवाखाना उपलब्ध व्हावा, अशी मागणी देखील यावेळी ग्रामस्थांनी केली.

गावात सूचना या फक्त ग्रामपंचायतीच्या भोंग्यावर (ध्वनीवर्धक) न देता वाड्यावस्त्यांवर दवंडी पद्धत उपयोगात आणावी, अशी मागणी देखील यावेळेस करण्यात आली. ग्रामसभेत ठराविक दोन तीन लोकच विषय मांडतात, पण त्यामुळे बाकीच्या नागरिकांना प्रश्न असून सांगता येत नाही. भविष्यात होणार्‍या ग्रामसभेत सर्वसामान्य नागरिकांना बोलण्याचा अधिकार उपलब्ध करून द्यावा, अशी चर्चा ग्रामस्थांनी केली.

यावेळी सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच श्रीकांत पवार, तंटामुक्ती अध्यक्ष बाळासाहेब उंडे, कारखान्याचे संचालक बाळासाहेब शिंदे, सोसायटीचे अध्यक्ष भगीरथ पवार, दिलीप पवार, शेतकरी संघटनेचे हरिभाऊ तुवर, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, प्रकाश जाधव, सोसायटीचे माजी उपाध्यक्ष जालिंदर विधाटे, कारखान्याचे माजी संचालक दिगंबर तुवर, बाळासाहेब कुलकर्णी, सोसायटीचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, माजी ग्रामसेवक नारायण नांदे, रामभाऊ जाधव, गंगाधर मतकर, चिलीया तुवर, ज्ञानेश्वर आढाव, कैलास पवार, संदीप पाटील, संजय शिंदे, हरिभाऊ जगताप, मन्सूर शेख, गणेश घोगरे, बाळासाहेब टिक्कल, अशोक पवार, जावेद शेख, मंजाबापू माळी, विकास गायकवाड, गणेश गवळी, संदीप आव्हाड, संदीप शिंदे, संजय जाधव, वंचीत बहुजन आघाडीचे डॅनियल देठे, भाऊसाहेब साळुंके, अशोक शिंदे यांच्यासह ग्रामविकास अधिकारी शिवाजी वाघूरवाघ, मुख्याध्यापक चंद्रकांत जाधव, मुख्याध्यापक मनोज पवार, ऊर्दू शाळेचे मुख्याध्यापक जमीर शेख, केंद्र प्रमुख दौलत तुवर, पोस्ट ऑफिसचे राजेंद्र चौधरी, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. के. डी. नजन, स्वस्त धान्य वाटप करणारे नंदू शिंदे, उपकेंद्र आरोग्याचे डॉ संदीप भालेराव, ग्रामपंचायत सदस्य वामनराव तुवर, शांताराम तुवर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विक्रांत पवार, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आदीसह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com