पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!

पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

जानेवारी (January) ते जून (June) या कालावधीत मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींवर (Grampanchayat) प्रशासक (Administrator) नियुक्त करण्याचे आदेश राज्य सरकारने (State Government) दिले आहेत.त्यामुळे या कालावधीत मुदत संपणार्‍या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका (Grampanchayat Election) एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचेगाव ग्रामपंचायत (Pachegav Grampanchayat) पदाधिकार्‍यांचा कार्यकाल काल मंगळवार 17 जानेवारी रोजी संपला. त्यामुळे आजपासून राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या पाचेगाव ग्रामपंचायतीवर (Pachegav Grampanchayat) प्रशासकीय राज असणार आहे.

पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!
भाजपच्या नव्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ना. विखे तर आ. थोरातांचाही प्रयत्न; कोणी केला दावा ?

ऑक्टोंबर ते डिसेंबर या तीन महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीच्या 18 डिसेंबर रोजी निवडणुका झाल्या आहेत. जिल्ह्यात जानेवारी महिन्यात बर्‍याच ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांचा कार्यकाल संपत आहेत. कार्यकाल संपण्यापूर्वीच ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या जातात, मात्र अद्याप या ग्रामपंचायतीचे प्रभागरचना व आरक्षण प्रक्रिया झालेली नाही. या प्रक्रियेला जवळपास महिना-दीड महिना लागतो.त्यामुळे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने जानेवारी ते जून या कालावधीत मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करा असे आदेश जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.

पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!
कुटूंबनियोजनाचे पुरूषांना वावडे!

त्यामुळे नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पाचेगाव ग्रामपंचायतीवर (Pachegav Grampanchayat) प्रशासक म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांची नियुक्ती झाले असल्याचे समजले जात आहे, तर सचिव म्हणून पाचेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांची निवड करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पाचेगाव ग्रामपंचायतीवर आज पासून प्रशासकीय राज असणार आहे.

पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!
30 लाख लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्य

गावात निवडणूक हाच चर्चेचा विषय

पाचेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक कधी लागते अन कधी नाही अशी स्थिती सत्ताधारी, विरोधकांबरोबर गावातील मतदारांची निर्माण झाली आहे. एकतर निवडणूक कधी लागणार याची अद्याप तरी कोणत्याच स्थानिक पुढार्‍यांना कल्पना नाही. मात्र तरीही बैठका जोर धरू लागल्या आहे. काहींना तर ‘उमेदवारी तुम्हालाच, कामाला लागा’ असे आश्वासन देखील देण्यात आल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. पण जोपर्यंत ग्रामपंचायत निवडणूक प्रोग्राम लागत नाही, तोपर्यंत तरी गावात ग्रामपंचायत निवडणूक चर्चेचा विषय बनणार आहे.

पाचेगाव ग्रामपंचायतीत उद्यापासून प्रशासक राज!
माळीवाडा बसस्थानकात तीन अतिरेकी घुसले.. पोलिसांनी पकडले! पण...

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com