पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथील बुशरा अब्बास शेख (वय 5) या मुलीला ऐन दसर्याच्या पहाटे सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झाला.
याबाबत माहिती अशी की, बुशरा ही मुलगी रात्री घरात गाढ झोपेत असताना तिला सर्पदंश झाला. तिला स्थानिक दवाखान्यात नेण्यात आले होते. त्यानंतर नेवासा येथील खासगी डॉक्टरांकडे नेले असता त्यांनी बुशरा मरण पावल्याचे घोषित केले. बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने पाचेगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.