पाचेगाव परिसरात रात्री चोरटे मारताहेत कापसावर डल्ला

पाचेगाव परिसरात रात्री चोरटे मारताहेत कापसावर डल्ला

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसरातील शेतकरी आधीच अनेक समस्यांनी ग्रासले असतानाच अतिवृष्टीतून कशाबशा वाचलेल्या कपाशींचा फुटलेल्या कापसाची रात्री चोरी होऊ लागल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सविस्तर असे की, पाचेगाव शिवारात गट नंबर 242 मध्ये अशोक कारखान्याचे माजी संचालक भागवतराव पवार व त्यांचा मुलगा अशोक भागवत पवार यांची शेती प्रवरा नदीच्या काठावर आहे. रात्री त्या भागात कोणी नसते. त्यांची जवळपास अडीच एकर कपाशी आहे. कापूस देखील पूर्ण फुटलेल्या अवस्थेत आहेत. या भागात सध्या कापूस वेचणीसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. अशोक पवार हे मंगळवारी सकाळी शेतात कामानिमित्ताने गेले असता त्यांना आपला कापूस चोरी झाल्याचे दिसून आले. उसाच्या क्षेत्रालगत कपाशी क्षेत्र आहे. पण उसाच्या क्षेत्राकडून कपाशीच्या सर्‍या अर्ध्या वेचलेल्या अवस्थेत दिसून आल्या. त्यात त्यांच्या अंदाजानुसार चार ते पाच क्विंटल कापूस चोरीस गेला आहे.

आज कापसाला प्रतिक्विंटल 7 हजाराहून अधिक भाव मिळत आहे. त्यानुसार त्यांचे किमान 35 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. कापूस चोर हे परिसरातील असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.पण संशय कोणावर घ्यावा हा देखील महत्वाचा मुद्दा आहे. काम न करता रात्री शेतकर्‍यांचा कापूस चोरी करून तो सकाळी कोणी न पाहता विकून टाकायचा आणि त्यात चाळीस ते पन्नास हजार रुपये रातोरात कमवायचे हा फंडा पाचेगाव परिसरातील कापूस चोर सध्या वापरीत आहेत.

मागील वर्षी देखील बर्‍याच शेतकर्‍यांचा कापूस चोरी गेला होता. त्यात काही शेतकर्‍यांनी रात्री कापूस राखत चोर पकडले होते. आता त्याचीच पुनरावृत्ती होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com