पाचेगाव-कारवाडी भागात अवकाळीने प्रचंड नुकसान

गहू झोपला, कांदा झोपला, झाडे कोसळली || ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या उडाल्या
पाचेगाव-कारवाडी भागात अवकाळीने प्रचंड नुकसान

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) पश्चिम पट्ट्यातील पाचेगाव (Pachegav) परिसराला शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास वादळी वार्‍यासह (Stormy winds) व विजांच्या कडकडाटासह (Lightning strikes) आलेल्या अवकाळी पावसाने (Untimely Rain) जोरदार तडाखा दिला. गव्हाचे पीक (Wheat crop), मका पीक (Corn crop) आडवे झाले. शेतात काढणी करुन पडलेला कांदा (Onion) भिजला. झाडे पडली. ऊस तोडणी कामगारांच्या झोपड्या उडाल्या.

पाचेगाव (Pachegav), पुनतगाव (Punatgav) आदी भागात सोसाट्याच्या वार्‍यासह रिमझिम पावसाने (Rain) हजेरी लावली. पाचेगावातील (Pachegav) कारवाडी भागात अवकाळी पावसाचा जोर अधिक होता. तब्बल अर्धा तास जोरदार वार्‍यासह पाऊस सुरू होता. काढणीला आलेल्या कांदा (Onion), गहू पीकासह (Wheat Crop) जनावरांसाठी (Animals) लागणारा मका (Corn), कडवळ आदी चारा पीकांचे अतोनात नुकसान (Loss) झाले. अनेक ठिकाणी झाडंही उन्मळून पडली. तर आंबा झाडांचा मोहोर पूर्णपणे गळून जमिनीवर कोसळला.

या भागात सध्या ऊसतोडणी (Sugarcane cutting) जोरात सुरू आहे. कारवाडी भागात अशोक कारखान्याचे ऊस तोडणीसाठी दोन टोळ्या आहे. पण अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे ऊस तोडणी कामगारांच्या राहत्या कोप्यात पाणी शिरून जीवनोपयोगी वस्तू बरोबर धान्य देखील भिजले आहे. त्यात त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या बैलांना देखील निवारा नसल्याने बैल (Bull) व गाय (Cow) पावसाने भिजून रात्रभर जनावरे उभी होती.

काढणीला आलेला कांदा (Onion) व गहू (Wheat) भिजून शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आता शेतकर्‍यांना पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्याची अपेक्षा या भागातील शेतकरी वर्ग करीत आहे. तातडीने नुकसान क्षेत्र पाहणी करून कृषी अधिकारी व तहसीलदार यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा.

शेतकर्‍यांच्या बाधित क्षेत्राची पाहणी करून वरिष्ठ पातळीवर अहवाल सादर करण्यात येईल. अद्यापपर्यंत तरी आम्हाला नुकसान झालेल्या क्षेत्राच्या पाहणीचे आदेश नाहीत. आदेश येताच सर्व बाधित क्षेत्राची पाहणी करून अहवाल सादर करण्यात येईल. तसेच कृषी अधिकारी यांच्याबरोबर चर्चा केली असून त्यांनादेखील बाधित क्षेत्राची पाहणी करण्यास सांगितले आहे.

- रुपेशकुमार सुराणा तहसीलदार, नेवासा

जवळपास 50 हेक्टर क्षेत्र बाधित

अवकाळी पावसामुळे कारवाडी भागात पन्नास हेक्टरच्या आसपास क्षेत्र बाधित झाले आहे. राजू शेख यांचा एक एकर गहू, सुनील शेळके यांची 10 गुंठे मका, शंकर शिंगोटे यांचा काढून ठेवलेला एक एकर क्षेत्रावरील कांदा, राजू सय्यद यांचा दोन एकर गहू व दीड एकर कांदा, दिगंबर तुवर यांचा एक एकर गहू याशिवाय आणखीही बर्‍याच शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. गावरान व कलमी आंबा पिकांचे मोहर गळाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

आमच्याकडे कांदा क्षेत्र आहे. त्यात जवळपास एक एकर कांदा शेतात पडून आहे. पण अवकाळी पावसामुळे जवळपास आठ टन कांदा भिजला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरिष्ठ पातळीवर बाधित क्षेत्र पाहणी करून तातडीने पंचनामे करण्यात येऊन शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा.

- शंकरराव शिंगोटे शेतकरी, कारवाडी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com