आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील ओझर खुर्द येथे रविवारी लागलेल्या आगीमध्ये येथील पाच शेतकर्यांचा तब्बल 8 एकर ऊस जळाल्याने अंदाजे 8 ते 9 लाख रुपये नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.

याबाबत सरपंच पुंजाहरी शिंदे यांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी दुपारी 12.30 ते 1 वाजेच्या सुमारास मनोली - ओझर रस्त्यालगत असलेल्या गट नंबर 39 मधील दौलत मंगु बनवाले यांचा 1 हेक्टर, बाबासाहेब मंगु बनवाले यांचा 1 हेक्टर, गट नंबर 41 मधील राजेंद्र बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे, संजय बाळासाहेब शिंदे यांचा 24 गुंठे तसेच प्रभाकर बाबुराव पराड यांचा 2 एकर ऊस विजेच्या खांबावर शॉटसर्कीट झाल्याने जळाला आहे.

उसाला आग लागल्याची माहिती मिळताच संगमनेर कारखान्याचा अग्नीशमन बंब घटनास्थळी दाखल झाला होता. याप्रसंगी उपस्थित स्थानिक ग्रामस्थांच्या व तरुणांच्या मदतीने आग विझवण्यात आली असली तरी येथिल पाच शेतकर्याचे तब्बल 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान महावितरणच्या वीज वाहक तारामुळे झालेल्या शॉटसर्कीटमुळेचं या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाल्याचे स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांचे म्हणणे असल्याने या नुकसानग्रस्त शेतकर्यांना महावितरणने अर्थिक भरपाई द्यावी,अशी मागणी केली आहे.

यावेळी सरपंच पुंजाहरी शिंदे, ग्रामपंचायत सदस्य बकचंद साबळे, झुंगाराम साबळे, गणेश शेपाळ, शांताराम शिंदे, पुंजाजी शिंदे, शांताराम पांडे, शिवाजी शेजुळ, बाळासाहेब शिंदे, शिवाजी शिंदे, संजय दिवे आदींसह स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.