ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईना

मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा
ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात करोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधित होऊन उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या मोठी आहे.

यामुळे आधी बेडसाठी कसरत करणार्‍यांवर आता रेमडेसिवीर आणि त्यानंतर ऑक्सिजनसाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील सरकारी आणि खासगी रुग्णालयांना दररोज 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची मागणी असताना प्रत्यक्षात 35 मेट्रीक टनापर्यंत ऑक्सिजनचा पुरवठा होत असल्याने अडचणी कायम आहेत.

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात करोनाची स्थिती भयावह झाली आहे. गेल्या आठ दिवसांत करोना बाधितांचा आकडा वाढतांना दिसत आहे. यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. नगर शहर सोडले तर ग्रामीण भागात व्हेंटीलेटरची संख्या नग्ण असल्याने अत्यावश्यक असणार्‍या रुग्णांवर उपचार कसा करावा, प्रश्न आरोग्य यंत्रणेवर आहे.

गेल्या आठ दिवसांपासून रेमडिसीवीर इंजेक्शनचा प्रश्न मिटलेला नाही. लिमिटेड मिळणार इंजेक्शनचा साठा त्यातून कोणत्या तालुक्याला किती इंजेक्शनचा पुरवठा करावा, असा प्रश्न प्रशासना समोर आहे. त्यात आता ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगर जिल्ह्यात नेवासा येथील प्रकल्पातून दररोज दीड मेट्रीक टन तर नगरच्या एमआयडीसीच्या प्रकल्पातून अवघा सहा मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होणार आहे.

त्यातही एमआयडीच्या प्रकल्पाची काल चाचणी झाली असून आजपासून प्रत्यक्षात उत्पादनाची शक्यता आहे. मात्र, उर्वरित ऑक्सिजन पुणे जिल्ह्यातील चाकण येथून मागणविण्याशिवाय पर्याय नाही. जिल्ह्याला दैनदिन 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची गरज असून प्रत्यक्षात 30 ते 35 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध होत असल्याने त्यावर काम भागविण्याची वेळ हॉस्पिटलवर आली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com