100 ऑक्सिजन बेडचे काळे कोविड सेंटर कार्यान्वित

100 ऑक्सिजन बेडचे काळे कोविड सेंटर कार्यान्वित

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

मतदारसंघासाठी 100 ऑक्सिजन बेडचे समर्पित कोविड सेंटरचे युद्धपातळीवर काम पूर्ण झाले असून कर्मवीर शंकरराव काळे यांच्या नावाने सोमवार पासून सेंटर रूग्णसेवेत दाखल झाले. आमदार आशुतोष काळे यांनी सेंटरचे लोकार्पण केले.

शेकडो कोरोना बाधित ऑक्सिजन बेड मिळत नसल्याने त्रस्त होते. यावर आ. काळे यांनी 100 ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरू मोठा दिलासा दिला आहे. मृत्यू दर कमी होण्यास या सेंटरमुळे मदत होणार आहे. अँटिजेन टेस्ट करण्यासाठी आवश्यक असणार्‍या किटची टंचाई जाणवताच स्वखर्चातून पहिल्या टप्यात एक हजार व दुसर्‍या टप्यात दोन हजार अशा एकूण तीन हजार टेस्टिंग किट आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच साईबाबा तपोभूमी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बाधित रुग्णांच्या सेवेसाठी ऑक्सिजन अ‍ॅम्बुलन्स देखील आ.काळे यांनी दिली आहे.

याप्रसंगी सभापती पूर्णिमा जगधने उपसभापती अर्जुनराव काळे, काळे कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम कारभारी आगवन, गोरक्षनाथ जामदार, धरमशेठ बागरेचा, मंगेश पाटील, वीरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीज शेख, राजेंद्र वाकचौरे, हाजीमेहमूद सय्यद, सुनील शिलेदार, नवाज कुरेशी, डॉ. चंद्रशेखर आव्हाड, डॉ. दीपक पगारे, प्राचार्य डॉ. शंकरराव थोपटे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष विधाते, डॉ. वैशाली बडदे आदी उपस्थित होते.

करोना बाधित रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन बेड मिळत नसल्यामुळे मनाला वेदना होत होत्या. 100 ऑक्सिजन बेडचे डेडिकेटेड कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. ग्रामीण रुग्णालयात आयसीयूसह 30 व या डेडिकेटेड कोविड सेंटरचे 100 असे एकूण 130 बेड गंभीर रुग्णांसाठी उपलब्ध करून देऊ शकलो याचे समाधान आहे. ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांन्ट उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. नियमित वापरात येणार्‍या 30 ऑक्सिजन सिलेंडची क्षमता असलेले आठ लाख रुपयांचे दोन ड्युरा सिलेंडर खरेदी केले आहे.

- आमदार आशुतोष काळे

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com