
अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यात आज तब्बल १२६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये जामखेड ०२, नगर ग्रामीण ३, नगर शहर ७९, नेवासा २, पारनेर ०३, राहाता ७, संगमनेर १७, शेवगाव १, श्रीगोंदा १०, श्रीरामपूर येथील ०२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ९२० इतकी झाली आहे.