तीन वर्षात 20 गावात साथजन्य आजारांचा उद्रेक

पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद आरोग्य विभाग अर्लट
तीन वर्षात 20 गावात साथजन्य आजारांचा उद्रेक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या (Corona) कहरातून काहीशी उसंत मिळत असतांना आरोग्य खात्यासमोर (Health Department) पुन्हा पावसाळ्यातील साथरोग नियंत्रण (Disease Control), नैसर्गिक आपत्ती, (Natural disasters)मान्सून व पुरपरिस्थिती नियंत्रण (Flood control) करण्याचे आवाहन आहे. गेल्या दोन वर्षापासून करोना संसर्गाच्या (Corona contagion) कहरमुळे आरोग्य खाते आधी कामाच्या ओझ्याखाली दबलेले असतांना आता पावसाळ्यातील साथ नियंत्रणाची तयारी सुरू करण्यात आली आहे. यासाठी गेल्या तीन वर्षात पावसाळ्यात साथींचा उद्रेक झालेल्या गावांवर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असून अशी 20 गावे जिल्ह्यात आहेत.

जिल्ह्यात पावसाळ्यात प्रामुख्याने, हिवताप (Maleria), डेंग्यू (Dengue), डेंग्यू सदृष्य आजार, गॅस्टो (Gasto), रुबेला (Rubella), गोवर (Measles) आणि अन्नातून विषबाधा हे साथीचे आजारांचा सामुदायिक प्रसार होण्याची शक्यता असते. यादृष्टीकोनातून जिल्हा परिषदेचे आरोग्य विभाग (ZP Health Department) आधीच विविध उपाययोजना करून ठेवत असते. यासाठी जिल्हा पातळीवरून तातडीचा औषधांचा पुरवठा (Supply of medicines) करण्यासोबत चार स्वतंत्र पथके तैनात असतात. यासह तालुका पातळीवर तालुका आरोग्य अधिकारी आणि त्यांचे पथकही साथीच्या आजारांचा मुकाबला करण्यासाठी तयार असतात. साथजन्य आजारांवर उपचार करण्यासाठी 21 औषधाची यादी तयार करून त्या औषधाचा साठा तालुकानिहाय करण्यात येतो. यासह गेल्या तीन वर्षात ज्या ठिकाणी साथजन्य आजारांचा फैलाव झालेला असतो, त्या गावांमध्ये पुन्हा साथीचा उद्रेक (Eruption) होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्या गावांवर आरोग्य विभागाची (Health Department) करडी नजर असते.

जिल्ह्यात 2018-19 मध्ये राहुरी(Rahuri) तालुक्यातील करजगावमध्ये आणि संगमनेर (Sangmner) तालुक्यातील सावरचोळ गावात गोवर, शेवगाव(shevgav) तालुक्यातील शेकटे गावात डेंग्यू, अकोल्यातील पिंपळदरीमध्ये गॅस्ट्रो, पारनेर (Parner) तालुक्यातील काळेवाडी विषबाधा, अकोले (Akole) तालुक्यातील कोतुळमध्ये रुबेला, नगर (Nagar) तालुक्यातील नेप्तीमध्ये विषबाधा साथीचा उद्रेक झाला होता. त्यानंतर 2019-20 मध्ये श्रीगोंंदा (Shrigonda) तालुक्यातील एरंडलमध्ये विषबाधा, कोपरगावमधील (KOpargav)सुभाष नगर, टिळकनगरमध्ये डेंग्यू, श्रीगोंदा (Shrigonda)तालुक्यातील पारगाव सुद्रिकमध्ये डेंग्यू, कोपरगाव (KOpargav) तालुक्यातील सोनारीमध्ये ताप, नगर तालुक्यातील नागरदेवळेमध्ये डेंग्यू, श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील शिरसगावमध्ये ताप, राहुरीमध्ये (Rahuri) म्हैसगावात ताप, शेवगाव (Shevgav) शहरटाकळी ताप, नगर तालुक्यातील देहरे गावात विषबाधा आणि संगमनेर 9Sangmner) तालुक्यातील निमोण गावात विषबाधा ही साथीचे आजार पसरले होते. 2020-21 मध्ये राहुरी तालुक्यातील टाकळीमियामध्ये अन्नातून विषबाधा, संगमनेर तालुक्यातील मंडलिक वस्तीवर संशयीत डेंग्यू आणि श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा साखर कारखाना येथे तापची साथ पसरली होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com