
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने 5 ते 20 जुलै दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावात शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी शोध माहिम राबविण्यात आली. या मोहिमेचा कालावधी संपून अद्याप एकाही तालुक्याचा परिपूर्ण अहवाल जिल्हा परिषद शिक्षण विभागाला प्राप्त झालेला नाही. यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील हे जिल्ह्यातील 14 गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस काढणार आहेत.
दोन वर्षापासून करोनाच्या संकटामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य होण्याची शक्यता आहे. यामुळे शालेय शिक्षण विभागाने यंदा प्रभावी प्रमाणे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. तसेच एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाहीत, यासाठी गावातील प्रत्येक कुटूंबाला भेट देवू स्थालांतरी झालेले आणि स्थालांतर होवून आलेल्या कुटूंब आणि त्यांच्या मुलांची माहिती संकलित करण्याचे आदेश दिले होते.
त्यासाठी 5 ते 20 जुलैदरम्यान विशेष मोहिम राबविण्यात आली. यात अ, ब, क आणि ड प्रपत्रात माहिती संकलित करण्यात आली. यात अ प्रपात्र गावातील प्रत्येक कुटूंबाचा तपाशील, ब प्रपत्रात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा तपाशील, क प्रपत्रात स्थालांतर होवून गेलेले विद्यार्थी आणि ड प्रपत्रात स्थालांतरीत होवून आलेल्या विद्यार्थ्यांच्या माहितीचा समावेश होता. मात्र, मोहिम कालावधी संपूण पाच लोटले असले तरी अद्याप शाळाबाह्यांचा तालुकानिहाय अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला प्राप्त नाही. यामुळे शिक्षणाधिकारी पाटील यांनी 14 तालुक्यांच्या गटशिक्षणाधिकारी यांना नोटीस काढण्याचा निर्णय घेतला आहे.